युती सरकारमध्ये सामील झालो, म्हणून माझी भूमिका…; छगन भुजबळ यांचं महत्वाचं वक्तव्य

Chhagan Bhujbal : मनोहर कुलकर्णी यांना संभाजी नावाची आवश्यकता का भासली?; छगन भुजबळ यांचा थेट सवाल

युती सरकारमध्ये सामील झालो, म्हणून माझी भूमिका...; छगन भुजबळ यांचं महत्वाचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 1:07 PM

नाशिक | 20 ऑगस्ट 2023 : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला गेला. त्यावर आज बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सरस्वती आणि शारदा देवीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ मीडियावर भडकले. तुम्ही एक बाजू सांगता, तशी दुसरी पण माझी बाजू असते.ती तुम्ही सांगणार असला, तर यापुढे तुमच्याशी बोलेल, असं भुजबळ म्हणाले. मी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेल, असं काही नाही. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही.. यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. भिडे यांनी वाडा दिल्यामुळे तिथे पहिली शाळा सुरू झाली. पूर्वी ब्राम्हणांच्या मुलींना देखील शिक्षण नव्हतं. ते सावित्रीबाई, महात्मा फुले यांनी सुरू केलं. आमच्या घरात सगळे देव आहे. आम्हाला सगळे देव चालतात, असं भुजबळ म्हणाले.

कालच्या कार्यक्रमात ज्यांनी शिक्षणासाठी काम केले, त्यांचे फोटो होते. मी हे आजच बोलतोय असा काही भाग नाही. आपल्याला शिक्षणाची कवाडे फुले दाम्पत्याने खुली करून दिली. फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात, यांनी कोट्यवधी लोकांना शिक्षित केले. हे आमचे देव आहे, याची पूजा केली पाहिजे, असं मी म्हणालो, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ काय म्हणाले होते?

ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असं छगन भुजबळ काल म्हणाले. त्यावर आक्षेप घेण्यात आला.

छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंना सवाल केलाय. संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे स्पष्ट करा. ते जर मनोहर कुलकर्णी आहे, तर संभाजी नाव घेण्याची आवश्यकता का भासली? हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं, हे योग्य नाही, असं भुजबळ म्हणालेत.

ते काय प्रसार करतात, हे तुम्हाला माहीत आहे. हे असं असेल, तर आम्ही विरोध करणार. मी ज्या जातीत जन्माला आलो, त्या जातीत शिवाजी, संभाजी, धनाजी सगळी नावे आहेत. जे कोणी लोकं संभाजी भिडेंची बाजू घेतात, किंवा त्यांनी स्वतः स्पष्ट करावं. ते एवढ्या निर्भिडपणे महात्मा गांधी, फुले यांच्याबद्दल बोलतात, अगोदर त्यांनी स्वतःचं नाव स्पष्ट करावं, असंही छगन भुजबळ म्हणालेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.