Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएफआयवर भारतात 5 वर्षांची बंदी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं विधान! पीएफआयवरील बंदीबाबत काय म्हणाले? जाणून घ्या

पीएफआयवर भारतात 5 वर्षांची बंदी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 10:27 AM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI bans in India) या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने (Home Ministry) बंदी घातलीय. 5 वर्षांसाठी पीएफआयवर भारतात बंदी घालण्यात आलीय. या बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on PFI) यांनी स्वागत केलं. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पीएफआय संघटनेवर घातलेली बंदी योग्यच आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. शिवाय पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकारी नाही, असं देखील शिंदे म्हणाले.

केंद्रातील आणि राज्यातील गृहखातं योग्य प्रकारे काम करत आहे. राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात हयगय केली जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. तसंच जे लोक राष्ट्रविरोधी विचार पसरवू पाहत असतील, अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशकातील गोदावरी तीरावरील तपोवन परिसरात स्वामीनारायणाची भव्य दिव्य मंदिर तयार करण्यात आले आहे. नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : एकनाश शिंदे नाशिकमधून लाईव्ह

एनआयए, ईडी यांनी राज्य पोलिसांच्या साहाय्याने गेल्या 10 दिवसांत पीएफआयविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रासह 10 पेक्षा अधिक राज्यात छापेमारी करण्यात आली होती.

पीएफआयच्या विरोधात करण्यात आलेल्या एनआयएच्या छापेमारीत 300 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय. हे सर्वजण पीएफआयशी संंबंधित आहेत, असा आरोप करण्यात आलाय. या सगळ्यांनी आता कसून चौकशी सुरु आहे.पीएफआयवर टेटर फंडिंगचा गंभीर आरोप आहे.

एकीकडे देशभरात पीएफआयवर छापेमारी सुरु असतानाच राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात महत्त्वाची बैठकही पार पडली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या उपस्थितीत या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक झाली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या या सलग छापेमारीच्या कारवाईनंतर आता अखेर पीएफआयवर मोठी कारवाई करण्यात आलीय. फक्त पीएफआयच नव्हे तर  पीएफआयशी संबंधित इतर 9 संघटनांवरही केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातलीय.

मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला
मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला.
हकालपट्टीनंतरही सुटका नाही, 'त्या' खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच!
हकालपट्टीनंतरही सुटका नाही, 'त्या' खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच!.
शास्त्रींकडून हैवानांच्या मानसिकतेची दखल, 'त्या' विधानावर टीकेची झोड
शास्त्रींकडून हैवानांच्या मानसिकतेची दखल, 'त्या' विधानावर टीकेची झोड.
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा.
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर.
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'.
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट.
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा..
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा...
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट.