नाशिक : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरवर जात डोकं टेकवलं. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही. हे फक्त मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आहे. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांचं या गोष्टीला समर्थन आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत, असं गिरीश महाजन म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने निर्णय दिल्यापासून या चर्चा सुरू आहेत. दोन पक्ष असल्यामुळे नावांविषयी आणि खात्यांविषयी चर्चा होत असते. या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच निर्णय होईल, असं महाजन म्हणालेत.
बीआरएस पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यावर पैशाचा आणि निधीचा वापर ते करत आहेत. पण त्यांना फार काही उपयोग होणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे मुरलेले लोकं आहे आणि मतदार देखील मुरलेले आहे. पण मला नाही वाटतं. त्यांना यश मिळेल म्हणून त्यांना इथे आणण्यात आमचा कुठेही हात किंवा पाय नाही, असं महाजन म्हणालेत.
नाशिक जिल्हा निधी वाटप राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत. सर्व कामं नियमानुसार होत असतात. राष्ट्रवादीच्या आमदारांनी काय तक्रार केली, मला माहित नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार जर निधी कमी मिळत असेल म्हणून तक्रार करत असतील. तर मागच्या काळात काय झाले. ते बघावं, असं महाजन म्हणालेत.
नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले. एक खिडकी योजनेसारखे अनेक निर्णय घेण्यात आले. हे निर्णय लोकांसाठी यावं. म्हणून हा कार्यक्रम घेतोय. मोदी सरकारचं काम पोहोचवण्यासाठी आम्ही मोदी @9 हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असं महाजन म्हणालेत.
ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना झटक्यावर झटके बसत आहे.भविष्यात आणखी काही लोकं पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे सकाळच्या भोंग्याशिवाय आता काहीही राहिले नाही. अगदी वर्धापन दिन असतानाही उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार सोडून जात आहे. तेच त्यांना शुभेच्छा देतायेत.