सत्यजित तांबे गायब? नाशकात नाट्यमय घडामोडी, तांबे कालपासून अज्ञात स्थळी, प्रचंड गुप्तता.. काय घडतंय?

प्रचंड नाट्यमय घडामोडी घडत असताना, तुमची नेमकी भूमिका काय, असा सवाल डॉ. सुधीर तांबे यांना विचारण्यात येतोय. मात्र योग्य वेळ आल्यावर आम्ही भूमिका स्पष्ट करू, अशीच अगम्य प्रतिक्रिया तांबे यांनी दिली.

सत्यजित तांबे गायब? नाशकात नाट्यमय घडामोडी, तांबे कालपासून अज्ञात स्थळी, प्रचंड गुप्तता.. काय घडतंय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 9:37 AM

चंदन पूजाधिकारी, नाशिकः नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अगदी मतमोजणीच्या (Vote Counting) दिवशीही प्रचंड नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या हालचाली राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहेत. आज मतमोजणी असल्याने कालपासून सत्यजित तांबे यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र कालपासूनच सत्यजित तांबे (Satyajit Tambe) गायब असल्याचं समोर आलंय. तांबे कुटुंबियांकडे तसेच कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता ते अज्ञात स्थळी गेल्याचं सांगण्यात येतंय. मतमोजणीच्या अगदी ऐनवेळी सत्यजित तांबे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय घडतंय नाशिकमध्ये?

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. काही वेळातच पहिले कौल हाती येतील. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील विरोधात सत्यजित तांबे अशी प्रमुख लढत होणार आहे. तत्पुर्वी आज सकाळपासूनच सत्यजित तांबे यांच्या विजयाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा आहे..

निकालाआधीच बॅनर्स लागले

आज सकाळी मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच सत्यजित तांबे यांच्या विजयाचे, त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स नाशिकमध्ये झळकले आहेत. निकाल येण्यापूर्वीच अशी घाई का केली जातेय, असे प्रश्नही विचारले जात आहेत. या दरम्यान, सत्यजित तांबे अचानक गायब झाल्याने यामागे नेमकी कोणती खेळी आहे, अशी चर्चा सुरु आहे.

दुपारी ३ वाजता समोर येणार

टीव्ही ९ च्या प्रतिनिधींनी सत्यजित तांबे यांच्या निकटवर्तीयांकडे चौकशी केली असता सत्यजित तांबे दुपारी ३ वाजता मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणी दाखल होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. आज दुपारपर्यंतच निवडणुकीचे स्पष्ट निकाल हाती येतील, त्यानंतरच सत्यजित तांबे माध्यमांसमोर येऊन स्पष्ट प्रतिक्रिया देतील, अशी शक्यता आहे.

अगम्य, अस्वस्थता का?

नाशिक पदवीधर मतदार संघात तांबे पिता-पुत्रांनी अगदी सुरुवातीपासूनच धक्का तंत्राचा वापर केल्याचं दिसून येतंय. पिता डॉ. सुधीर तांबे हे काँग्रेसचे तीन टर्मचे आमदार होते. त्यामुळे काँग्रेसने यावेळीही मविआकडून सुधीर तांबे यांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला. मात्र सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.

तर पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजित तांबे यांच्या खेळीमागे भाजप असल्याचं म्हटलं गेलं. मात्र अगदी शेवटपर्यंत भाजपने सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा दिला नाही.

या सर्वांमध्ये तुमची नेमकी भूमिका काय, असा सवाल डॉ. सुधीर तांबे यांना विचारण्यात येतोय. मात्र योग्य वेळ आल्यावर आम्ही भूमिका स्पष्ट करू, अशीच अगम्य प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. त्यामुळे एकूणच तांबे पिता-पुत्रांच्या धक्कातंत्रामुळे नाशिकच्या निवडणुकीत अस्वस्थता पहायला मिळतेय.

विजयाचा आत्मविश्वास-शुभांगी पाटील

तर महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवलेल्या शुभांगी पाटील यांनी आपणच निवडणूकीत विजयी होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासून आज त्या माध्यमांना दिलखुलास उत्तरं देत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.