मुक्ताई नगरातून माहेरची साडी, शुभांगी पाटील-एकनाथ खडसे भेट, नाशिकमध्ये काय घडणार?

राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या क्षेत्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

मुक्ताई नगरातून माहेरची साडी, शुभांगी पाटील-एकनाथ खडसे भेट, नाशिकमध्ये काय घडणार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 2:17 PM

रवि गोरे, जळगावः नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduation constituency ) निवडणूक कोण जिंकणार याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकिकडे काँग्रेसशी दगाफटका करत सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी वेगळी वाट धरली. तर शुभांगी पाटील (Shibhangi Patil) यांच्या पाठिशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहिल्याचं चित्र आहे. शुभांगी पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेतली. जळगाव येथील मुक्ताई नगरातील खडसे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

मुक्ताईनगरात येऊन मी माहेरी आले, मला माहेरची साडी भेट मिळाल्याची प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी टीव्ही 9 ला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘ माहेरी आलेल्या मुलीला माहेरची साडी भेट देत आशीर्वाद नाथाभाऊंनी मला दिला आहे. आई-वडिलांकडून जो आशीर्वाद पाहिजे होता तोच मिळाला आहे, त्यामुळे माझ्या यशाचा मार्ग सुकर होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर मी आता एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेतला आहे.  आता पदवीधरांच्या प्रश्नावर फोकस करून प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहेत, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

नाशिक मतदारसंघात काय स्थिती?

राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या क्षेत्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे येथे मागील तीन टर्म निवडून आले. त्यामुळे त्यांनाच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली व त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.

सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार?

तांबे पिता पुत्रांनी केलेल्या खेळीमागे भाजप आहे का, याची चर्चा सुरु आहे. मात्र भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही. सत्यजित तांबे यांनी वैयक्तिक पातळीवर जोरदार प्रचार सुरु केलाय. तर शुभांगी पाटील यांच्या पाठिशी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं दिसून येतंय.

सत्यजित बाळासाहेब थोरात अडचणीत?

तर सत्यजित तांबेंमुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. डॉक्टर तांबेंनी एबी फॉर्म न घेता तो न भरणं पक्षाच्या दृष्टीने अतिशय वाईट झालं… काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांनी अचडणीत आणलं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. तांबे पिता-पुत्रांच्या निर्णयामुळे थोरात कात्रीत सापडल्याची चर्चा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.