Nasik NMC election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग, तीन पक्षांमध्ये लढत; नाशिकच्या प्रभाग 11मध्ये कोण ठरणार सरस?

मागील वेळी चार सदस्यीय प्रभागामध्ये रिपाइं, मनसे आणि बसपा यांनी यश मिळवले होते. त्यामुळे यावेळी तिरंगी विजय असेल की आणखी काही वेगळे समीकरण आणि विजय पाहायला मिळणार हे रंजक असणार आहे.

Nasik NMC election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग, तीन पक्षांमध्ये लढत; नाशिकच्या प्रभाग 11मध्ये कोण ठरणार सरस?
नाशिक महानगरपालिका, वॉर्ड 11Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 12:12 AM

नाशिक : महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या (Municipal election) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शासन आणि प्रशासन दोन्हीही या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग एकीकडे झाला. त्यानंतर आता भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळणार आहेत. नाशिक महापालिका (Nasik NMC Election 2022) वॉर्ड क्रमांक 11मध्येदेखील यावेळी वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभागरचना होती. यावेळी ती तीन प्रभागांमध्ये बदलण्यात आली आहे. 44 प्रभागांतील एकूण 133 जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग 11च्या चार सदस्यीय पॅनलमध्ये मागील वेळी रिपाइं, शिवसेना यांनी यश मिळवले होते. तर मनसेनेदेखील दोन ठिकाणी विजय मिळवला होता. यावेळी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता असणार आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

नाशिक महापालिकेतील प्रभाग 11 हा गंगापूर आनंदवलीचा परिसर आहे. यात गंगापूर गाव, आनंदवली, काळेनगर, संत कबीर नगर, सिरीन मिडोज, बळवंत नगर, सोमेश्वर परिसर, सद्गुरू नगर त्याचप्रमाणे सोमेश्वर कॉलनी आदी परिसर येतो.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 11मधील एकूण लोकसंख्या 30,080 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 5,696 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3,168 एवढी आहे. शेवटची जनगणना ही 2011साली झाली होती. त्यामुळे त्यात 10 टक्के अतिरिक्त संख्या गृहीत धरण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

अल्पसंख्याकांची मते या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता असणार आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभागामध्ये रिपाइं, मनसे आणि शिवसेना यांनी यश मिळवले होते. त्यामुळे यावेळी तिरंगी विजय असेल की आणखी काही वेगळे समीकरण आणि विजय पाहायला मिळणार हे रंजक असणार आहे.

विजयी उमेदवार (2017)

  1. 11 (A) दीक्षा लोंढे
  2. 11 (B) योगेश शेवरे
  3. 11 (C) सलीम शेख
  4. 11 (D) सीमा निगळ
वॉर्डविजयी उमेदवारपक्ष
11 (अ)लोंढे दीक्षा दीपकरिपाइं
11 (ब)शेवरे योगेश किरणमनसे
11 (क)शेख सलिम इस्माईलमनसे
11 (ड)निगळ सीमा गोकुळशिवसेना

आरक्षण कसे?

प्रभाग 11 अ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. 11 ब हा अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.