मंत्रिपदाचं मला फार अप्रूप नाही, कारण…; छगन भुजबळ यांनी स्पष्टच बोलून दाखवलं

Chhagan Bhujbal on Ministership : अजित पवार यांच्यासोबत बंड केलं, मंत्रिपदाची शपथ घेतली अन् पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले, मंत्रिपदाचं मला काही फार अप्रूप नाही...

मंत्रिपदाचं मला फार अप्रूप नाही, कारण...; छगन भुजबळ यांनी स्पष्टच बोलून दाखवलं
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 11:45 AM

नाशिक : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जात भाजपसोबत हातमिळवणी केली. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत इतरही राष्ट्रवादीचे नेते, आमदार त्यांच्यासोबत गेले. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या तीन नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांच्यासोबत जात युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर या नेत्यांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा होत आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

“मंत्रिपदाचं मला अप्रूप नाही”

मंत्रिपद माझ्यासाठी नवीन नाहीये. 1991 पासून अनेक वेळा सरकारमध्ये मंत्री राहिलेलो आहे. 1991 ला मी महसूल मंत्री झालो. तेव्हापासून अनेकदा सरकारचा भाग म्हणून काम केलं. सरकारमधून बाहेर राहिलो. अनेकदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रिपदाचं मला काही फार अप्रूप नाही, असं भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या आहेत. अगदी 2014 पासून ते काल परवापर्यंतच्या सगळ्या घटनांचा उहापोह मुंबईच्या सभेत अजितदादा पवार यांच्यासह सगळ्यांनी केली आहे. त्यामुळे मी त्यावर अधिक बोलणार नाही, असं भुजबळ म्हणाले.

शरद पवारांना थोडं विस्मरण झालेलं आहे. मला जुन्नर, एरंडोल, येवला इथे सुद्घा मागणी होती. त्याच वेळी येवल्याचे सर्व सरपंच, स्थानिक नेते सातत्याने रामटेक बंगल्यावर येत होते. त्यांनी सांगितलं आहे की, येवला तालुका मागास आहे.विकासासाठी तुमची आम्हाला आवश्यकता आहे. मग मी पवार साहेबांना सांगितले की, मला येवल्यात काम करण्याची संधी आहे. पुढे मग येवला मतदारसंघातून मी चारदा निवडून आलो, असंही भुजबळांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी पक्षात येणारा मी पहिला नेता आहे. त्यामुळे स्वाभाविकच माझ्या मतदारसंघात त्यांची सभा झाली. हा माझा अधिकार आहे, असंही भुजबळांनी सांगितलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.