6 डिसेंबरला कृषी कायद्याच्या समर्थनासाठी शेतकरी एल्गार, सदाभाऊ खोत यांची घोषणा, राजू शेट्टींवर टीकास्त्र
केंद्र आमि राज्य सरकारनं मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कृषी कायद्याच्या समर्थनात 6 डिसेंबरला शेतकरी एल्गार होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
नाशिक: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यातील शेतकरी संघटनांनी जागोजागी आंदोलन केलं. मात्र, शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे कृषी कायद्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. कृषी कायद्याच्या समर्थनात 6 डिसेंबरला शेतकरी एल्गार होणार असल्याची घोषणा केली आहे. (Sadabhau Khot on central agricultural law )
मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे. केंद्र आमि राज्य सरकारनं मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपला शेतमाल कुणालाही, कुठेही विकण्याचा अधिकार आहे. दिल्लीत सुरु असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. दिल्लीतील आंदोलन हे बाजार समित्या आणि राजकारणी प्रणित असल्याचंही खोत म्हणाले.
शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारली दिली जाऊ नये हा काही राजकारण्यांचा स्वार्थ आहे. पंजाबमध्ये हमीभावार होणाऱ्या खरेदीची सर्व रक्कम केंद्र सरकार राज्याला देतं. या मालात हेराफेरी करुन राजकारणी मलिका कमावतात. नव्या कृषी कायद्यामुळे ते बंद होणार असल्यामुळं कायद्याला विरोध होत असल्याचं खोत यांनी म्हटलंय.
राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर टीकास्त्र
एकीकडे भाजीपाला नियमनमुक्ती आणि अडत बंदीला पाठिंबा दिला. आता बाजू बदलल्यामुळं विरोध सुरु असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केलीय. कुणी काय भूमिका घ्यावी हा त्याचा प्रश्न आहे. मात्र शरद जोशी यांना अभिप्रेत असलेलं हे कृषी बिल असल्याचं सदाभाऊ म्हणाले. मार्केट कमिटी आणि दलालांसाठी बांडगुळ म्हणून काम करणारे मूठभर लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.
फक्त राजकारण सुरु- खोत
राज्यात मका आणि कापसाचे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. पंजाबमध्ये तांदूळ खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. खरेदीसाठी स्पर्धा वाढली तर शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे. देशात हमीभावानं फक्त 6 टक्के शेतमाल खरेदी केला जातो. ही व्यवस्था कायम राहणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. पण आता फक्त राजकारण सुरु असल्याचा आरोप सदाभाऊंनी केलाय.
संबंधित बातम्या:
BREAKING | शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? राजू शेट्टी कडाडले
Sadabhau Khot on central agricultural law