शिंदेगट राज्यकर्ता पक्ष नाही, त्यांच्यात अन् अजित पवार गटात जमीन आसमानचा फरक- संजय राऊत

Sanjay Raut on CM Eknath Shinde Ajit Pawar : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच अजित पवार यांच्या बंडाबाबतही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

शिंदेगट राज्यकर्ता पक्ष नाही, त्यांच्यात अन् अजित पवार गटात जमीन आसमानचा फरक- संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 10:57 AM

नाशिक 15 जुलै 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेगट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जमीन आसमानचा फरक असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तार आणि अजित पवारांना देण्यात आलेल्या अर्थखात्यावरूनही संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. पण शिंदे गट आणि अजित पवारांनामध्ये खूप फरक आहे. शिंदे गटाला किती महत्व आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यांचं महत्व फक्त शिवसेना फोडण्यासाठीचं होतं. आता शिंदे गटाचं महत्व संपलं आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

शिंदे गटात अनेक नेते आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहिलं आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांचा सरकारमधील अनुभव दांडगा आहे. अजित पवार यांच्या निर्णयाचं आम्ही समर्थन करत नाही. त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. यामुळे महाराष्ट्राचं नुकसानच होणार आहे. पण आता भाजपच्या दृष्टीने शिंदे गटाचं असेललं महत्व लक्षात येतं आहे, असं राऊत म्हणालेत.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ‘अलोकप्रिय’ असा त्यांनी उल्लेख केला आहे. अलोकप्रिय नेत्यांच्या सभेसाठी जशी माणसं आणली जातात, तसं शासकीय कार्यक्रमासाठीही लोकांना आणलं जात आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवावा लागत असेल, हे सरकार जनतेच्या मनातलं नाही. हा जनतेचा कार्यक्रम नाही, जबरदस्तीने माणसे आणली जात आहेत अजित पवार हे रेल्वेने नाशिकला आले आहे. रस्त्यात खड्डे असल्यामुळे ते रेल्वेने आले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. आम्हीही अडीच वर्षांपूर्वी कुटनिती केली होती. ती शिंदेगटाला मान्य झाली नाहीत, असंही ते म्हणालेत.

राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप पार पडलं. यात अजित पवार ज्या खात्यासाठी आग्रही होते ते अर्थखातं त्यांना मिळालं आहे. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. अजित पवारांची धुणीभांडी करावी लागणार आहेत. हे लोक आनंदाने टाळ्या वाजवतात ही मजबुरी आहे. अर्थखातं अजित पवारांना देऊन नये यासाठी जंग जंग पछाडलं. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यावरून शिंदेगटाचं महत्व लक्षात येतं, असं राऊत म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांच्यासह चार मंत्र्यांची मंत्रिपद जाणार आहेत. अजित पवार दिल्लीला गेले तेव्हाच त्यांना सांगितलं गेलं होतं की अर्थखातं तुमच्याकडे ठेवा, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.