Shivsena| नको प्रहार, नको बीजेपी, मनसे! आपण शिवसेनेतच स्वाभिमान दाखवा.. एकनाथ शिंदेंना नाशिक शिवसेना प्रमुखांचं भावनिक पत्र

मागील आठवड्यापासून राज्यातल्या विविध भागात शिवसैनिकांचेही दोन गट पडलेले दिसतायत. या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या नाशिकच्या शिवसेना प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलंय.

Shivsena| नको प्रहार, नको बीजेपी, मनसे! आपण शिवसेनेतच स्वाभिमान दाखवा.. एकनाथ शिंदेंना नाशिक शिवसेना प्रमुखांचं भावनिक पत्र
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 1:27 PM

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब तुम्ही निघून गेल्यामुळे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांमध्येच दोन गट पडले आहेत. जाळपोळ, घोषणाबाजी, बॅनरबाजी, तिरड्या उचलणे असे प्रकार घडतायत. शिवसेनेची ही दुर्दशा तुम्हीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहतायत, आता हे बस करा आणि आपल्या शिवसेनेत परत या.. एकनाथ शिंदेंना हे भावनिक आवाहन केलंय नाशिक येथील शिवसेना प्रमुख सुनिल बागूल (Sunil Bagul) यांनी. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध (Uddhav Thackeray) पुकारलेल्या बंडामुळे अवघा महाराष्ट्र वेठीस धरलाय. शिवसेनेतच दोन गट पडल्यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. कुठे बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर कुठे आम्ही उद्धव ठाकरेंचेच शिवसैनिक असून मरेपर्यंत गद्दारी करणार नाहीत, असं म्हणणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मागील आठवड्यापासून राज्यातल्या विविध भागात शिवसैनिकांचेही दोन गट पडलेले दिसतायत. या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या नाशिकच्या शिवसेना प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलंय.

सुनिल बागुल यांनी लिहेलेलं पत्र…

माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब / माननीय श्री केसरकर साहेब,

गेल्या 21 तारखेपासून आम्ही तुमच्या दोन्ही नेत्यांच्या तोंडून आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही दिघे साहेबांची शिवसैनिक आहोत, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आहोत. आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार नको तर आपण बीजेपी बरोबर सरकार स्थापन केले पाहिजे तसेच माननीय उद्धवजी साहेब म्हणाले, “मी तयार आहे पण तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला जाऊन हे सांगत आहे. तुम्ही मला हे मुंबईत सांगू शकला असता तुमच्या तत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या भांडणात शिवसैनिक मरतो आहे. एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाचा बोर्ड पाडतोय, काळे फास्तो, विरोधात घोषणा देतो, मोर्चा काढतो, तिरडी काढतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतो आहे तसेच शिवसेनेच्या आमदारांची नातेवाईक आमदारांचे समर्थक व पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक है शिवसेनेच्या विरोधात उभे राहून चॅलेंज करत आहे. शिवीगाळ करत आहे. आव्हान करत आहे आणि शक्ती प्रदर्शन करत आहे या सर्वामध्ये शिवसैनिकच मरतो आहे. शिवसैनिकाला दोन्ही बाजू सांभाळायच्या असतात. त्याला दोन्ही प्रिय आहे. शिंदे साहेब!

शिवसेनेची दुर्दशा बघताय ना…

सध्या राज्यातील शिवसैनिकांची स्थिती वर्णन करताना सुनिल बागूल पुढे म्हणालेत….

मी दिघे साहेब आणि तुमचे सुद्धा काम बघितले आहे. तुम्ही अनेक अॅम्बुलन्स वाटप केलेले आहे. तुम्ही अनेकांना नोकरी लावलेली आहे. गरिबांसाठी तुम्ही जीव का प्राण आहे. शिवसेनेबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्याच्या कानफटीत लावण्याची ताकद तुमच्यात आहे. शिवसेना तुमची जीव की प्राण आहे. तुम्ही शिवसैनिकाला अनेक संकटातून बाहेर काढले आहे. आज तुमच्या समोर शिवसेनेचे बॅनर फाडले जात आहे, शिवसेना कार्यालयाची तोडफोड होते याचे दुःख तुम्हाला होऊन सुद्धा दाखवता येत नाही. ज्या शिवसेनेवर तुम्ही अति प्रेम केलं त्याची दुर्देशा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे तसेच माननीय उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या छातीमध्ये 8 स्टेन आहे. त्यांच्या मानेची खूप मोठी सर्जरी झालेली आहे, त्यांना करोना झालेला आहे त्यांची तब्येत खूप खराब आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे अनेक आमदार आहेत आणि रोज एक एक आमदार येतो आहे हे सर्व बघितल्यानंतर मनाला खूप वेदना होत आहे जी शिवसेना रात्र पहाट कडून वाढवली त्याची अशी दुर्दशा बघतांना मनाला खूप वेदना होतात…

तुम्हाला बीजेपी पाहिजे ना… होईल

एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवाला आहे. तो धागा पकडून सुनिल बागुल यांनी लिहिलं…

तुम्हाला शिवसेना पाहिजे, उद्घवर्जीना तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला बीजेपी पाहिजे याचा जर योग्य ताळमेळ झाला तर शिवसेना सुद्धा टिकेल तुम्हाला जनतेच्या कामासाठी बीजेपी हवी आहे तेसुद्धा साध्य करता येईल, परंतु इकडे तिकडे जाऊ नका. नको प्रहार, नको बीजेपी, नको मनसे आपण शिवसेनेतच आपला स्वाभिमान दाखवायचा. साहेब, शिवसेनेतच राहा. उद्धव साहेबांच्या बरोबरच राहा. आम्ही राज्यस्तरावरील शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव साहेबांना विनंती करू, साकडे घालू आणि त्यांना तुमच्याबरोबर राहण्याची विनंती करू. तुम्ही सुद्धा साहेबांना एक मताने सांगा कि साहेब झाले गेले विसरून जा आम्हाला समजून घ्या आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शिवसैनिक याला वाचवा, ही नम्र विनंती करतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.