नवी दिल्ली : भगवान श्रीराम ही केवळ लाकडी किंवा दगडाची मूर्ती नसून ती आपल्या भारत देशाची ओळख आहे. सरकार रुग्णालये, शाळा, उद्योग त्याचबरोबर मंदिरेही बांधणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
रामनवमीनिमित्त आयोजित गुरुवारी झालेल्या एका परिषदेत संरक्षण मंत्री यांनी सांगितले की, जेव्हा राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा आला तेव्हा अनेकांनी त्यावर आपली वेगवेगळी मतं मांडली होती. काहींनी रामललाच्या जन्मस्थानी रुग्णालय बांधावे, तर काहींनी शाळा बांधण्याची सूचना केली होती.
त्या ठिकाणी उद्योग उभारता येतील अशीही सूचना करण्यात आली होती. ज्यांना भगवान राम माहिती नाही त्याच लोकांनी या गोष्टी करायला सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभू राम ही केवळ लाकडाची किंवा दगडाची मूर्ती नसून ती आपल्या संस्कृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे प्रभू राम ही आपल्या देशाची आणि संस्कृतीची ओळख असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
हे सांगत असताना त्यांनी सांगितले की, आम्ही रुग्णालये, शाळा आणि उद्योग उभा करणारच आहोत. मात्र त्याचबरोबर मंदिरंही बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्येकडील लोक दिल्लीच्या जवळ आले असल्याची माहितीही संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. प्रदेशाच्या विविध भागातून AFSPA मागे घेतल्यामुळे आज ईशान्य भारतात अभूतपूर्व शांतता असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महिलांविषयीही आपले मत व्यक्त केले. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही केवळ शासनाची घोषणा नाही. तर ती लोकचळवळ आहे.
त्यामुळे संरक्षण मंत्री म्हणून मी या महिलांचे मी अभिनंदन करतो कारण त्या महिला सशस्त्र दलाचा एक भाग बनून त्या अधिक बळकट होत आहेत.