उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला…; शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

Uddhav Thackeray : मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई होते, मग उद्धव ठाकरे यांच्यावर का नाही?, असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्याने टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर...

उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला...; शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 1:46 PM

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पण ही टीका करताना त्यांनी जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील कडक कारवाई व्हावी, असं शिंदे गट प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाचे खासदाल संजय राऊत यांच्यावरही किरण पावसकर यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्र्यांना इतर राज्यात बोलावलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे वक्तृत्व, कर्तृत्व नाही. एकनाथ शिंदेंना लोकांची लोकप्रियता मिळते मला का मिळाली नाही, असं ठाकरेंना वाटतं. पण विरोधकांनी महाराष्ट्राची काळजी करू नये. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी मंत्री त्या ठिकाणी पोहोचत आहेत, असंही किरण पावसकर म्हणालेत.

राऊतांवर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्या प्रकरणी आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना अटक झाली आहे. त्यांच्या अटकेनंतर संजय राऊत आक्रमक जाले आहेत. त्यांनी दळवी यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत या वक्तव्यांचं समर्थन करतीलच. शिव्याचंही समर्थन करतील. जी व्यक्ती कॅमेरावर थुंकत असेल तर त्यावर न बोललेच बरं, असं किरण पावसकर म्हणालेत.

दळवींना अटक, शंभुराज देसाई म्हणतात…

मी दळवीचं वक्तव्य एकलं त्याचं बोलणं चुकीचं आहे. जी कारवाई झाली ती कायद्याच्या चौकटीत झाली आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांबाबत बोलणं योग्य नाही, असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी दळवी यांच्यावरच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

दत्ता दळवी काय म्हणाले?

मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. धर्मवीर चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांनी ज्या शब्दाचा वापर केला होता. त्या शब्दाचा वापर मी केला आहे. मालवणी भाषेत याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत. त्या तर मी दिल्या नाहीत. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाचं राजकारण आहे, असं म्हणत दत्ता दळवी यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.