कधी डबल इंजिन तर कधी ट्रिपल इंजिन, भाजपला स्वत:चं इंजिन आहे की नाही?; संजय राऊतांचा खरमरीत सवाल
Sanjay Raut on BJP : उद्धव ठाकरे यांची भूमिका, भाजपला सवाल अन् समान नागरी कायद्यावर भाष्य; संजय राऊत काय म्हणाले? पाहा...
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपलाही त्यांनी थेट सवाल केलाय. समान नागरी कायदा लागू करा ही उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
आधी डबल इंजिन होतं. अजित पवारसोबत आल्याने आता ट्रिपल इंजिन झालं आहे, असं भाजप म्हणतं. त्यांना स्वतःचं इंजिन आहे की नाही हा प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक भाग सध्या प्रसिद्ध झाला आहे. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. जो तुमच्या पक्षात येईल त्याला भ्रष्टाचाराबद्दल वेगळा कायदा आहे आणि जो नाही बोलेल. त्यासाठी वेगळा कायदा आहे, असा घणाघात त्यांनी केला. शिवाय आधी समान नागरी कायदा लागू करा ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणाले.
माझी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही आप सोबत उभे आहोत, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीतील तटस्थ आमदारांचं मन वळवण्याचा अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर बोलताना मला त्याबद्दल जास्त माहीत नाही. पण मन वळवण्याचं काम सुरू आहे, असं राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या INDIA या आघाडीवर टीका केली आहे. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी संयम ठेवावा.या देशात इंडिया शब्दाने चांगल्या गोष्टी देशात घडतात. मदर इंडियायतील इंडिया त्यांना नको आहे का? NDA मधील अनेक पक्षात इंडिया आहेत. मग त्यांना पण नाव बदलायला सांगणार का? नक्कीच पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याने देशाचा अपमान झाला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
मोदी सरकारबाबतच्या अविश्वास प्रस्तावावरही त्यांनी भाष्य केलं. अविश्वास प्रस्ताव हे आमचं एक आयुध आहे. पंतप्रधान लोकसभेत येऊन देशातील अनेक प्रश्नावर ते उत्तर देतील असं वाटतं. त्यांच्याकडे बहुमत आहे. पण त्यांनी मणिपूर बाबत संसंदेत निवेदन द्यावं, हीच आमची मागणी आहे. अविश्वास ठरवावबाबत जे अपेक्षित आहे. त्या आमच्याकडे सह्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले.