खोटारडे राजकारणी सत्तेत, सारे टेंडरबाज!; मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर

Sanjay Raut on CM Ekath Shinde : भाजपवाले चिलीम मारून निघतात आणि पक्ष फोडतात; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदित्य ठाकरेंवरील टीकेलाही खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर. खोटारडे राजकारणी सत्तेत, सारे टेंडरबाज असल्याचा राऊतांचा दावा

खोटारडे राजकारणी सत्तेत, सारे टेंडरबाज!; मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 1:06 PM

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : विधिमंडळाचं अधिवेशल काप संपलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे काय बोलले मला माहित नाही. खोटारडे राजकारणी सत्तेवर बसले आहेत. त्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली आहे. मी आतही नाव घेऊ शकतो. आपण कोणावर बोलतो याचं भान त्यांना नसेल. भाजपच भाषण ते वाचून दाखवत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

आमचा सध्या सुरु असलेला लढा व्यक्ती विरुद्ध नाही. तर संविधान वाचवण्यासाठी आहे. संसदीय लोकप्रणाली, संसद वाचवण्यासाठी आमची लढाई आहे. जे लोक एका व्यक्तीच्या संरक्षणासाठी उभे आहेत. त्यांच्या अंतर आत्म्याला हे मान्य आहे का? हे विचारावं लागेल, असा थेट सवाल राऊतांनी केला आहे.

लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं. त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचा अधिकार नाही. रामाची लढाई रावणाशी होती. पण त्यांच्या मनात रावणाबद्दल त्यांना आदर होता. पण रामाचे भक्त आहेत. त्यांना हा रामाचा विचार मान्य आहे का? लोकशाहीच्या मंदिरात असं कृत्य करणंस, हा देशाचा मोठा अपमान आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार नाहीत. लालकृष्ण अडवाणी यांना पण निमंत्रण दिलं नाही. राम मंदिरासाठी त्याग केला त्यांना ते बोलावणार नाहीत. ज्याचं योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीला भान पाहिजे की आपली जात सांगितली नाही पाहिजे, असं म्हणत राऊतांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

भाजप चिलीम मारून निघतात आणि पक्ष फोडतात, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे. माझ्या माहितीप्रमाणे फडणवीसांचे अच्छे दिन येणार आहेत, असं राऊतांनी म्हटलंय.

पहिले आपल्या पक्षातील आमदार चिमणराव पाटील यांनी स्वतचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करा. त्यांनी पत्र लिहून सांगितल आहे की आरोग्य यंत्रणेत कसा भ्रष्टाचार झाला आहे. हिंमत असेल तर आधी त्याची चौकशी करा, असं आव्हान राऊतांनी दिलं आहे.

अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण.
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?.
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.