….तर आम्ही अविश्वासदर्शक ठराव मांडलाच नसता; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

मोदी सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठराव, संसदेतील फ्लाइंग किसचा मुद्दा आणि मनसे-ठाकरे गट युती; खासदार संजय राऊत यांची सविस्तर प्रतिक्रिया...

....तर आम्ही अविश्वासदर्शक ठराव मांडलाच नसता; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 11:54 AM

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : संसदेचं अधिवेशन सध्या सुरु आहे. यात विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. मोदी सरकार देशातील आणि विशेषत: मणिपूरमधील हिंसाचाराबाबत गंभीर नाही. मणिपूरमधील हिंसाचाराकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही. तिथल्या घटनांबाबत ठोस पावलं उचलावीत, असं म्हणत विरोध आक्रमक झालेत. अशातच संसदेत पुन्हा वापसी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी मणिपूरचा मुद्दा छेडला. त्याला सराकरकडून स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं. या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाष्य केलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांचं विक्रमी वेळेचं भाषण झालं. लालबहादूर शास्त्री यांच्या नावावर जास्त वेळ बोलण्याचा विक्रम होता. तो काल तुटला. अविश्वास प्रस्तव का आणला हे देशाला माहीत आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुदयवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत नाहीत. मणिपूरची परिस्थिती देशाला समजायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत अविश्वास प्रस्तावावर बोलणार आहेत. ते आज जे बोलतील ते याआधीच मणिपूरच्या विषयावर बोलले असते तर आज अविश्वास ठरावाची गरज पडली नसती, असं संजय राऊत म्हणालेत.

काल संसदेत जी भाषणं झाली ते अविश्वास ठरावाचं उत्तर नाही तर चिडचिड आहे सत्ताधारी भाजपने गेल्या 10 वर्षात काय झालं हे सांगावं. मागच्या 40 वर्षातील सांगू नये. मणिपूरचा धोका मोठा आहे. कारण तिथं बाजूला चीन आहे. अमित शाह यांचं भाषण राजकीय आहे, असंही राऊत म्हणालेत.

देशात ईडीने कसा काम सुरू केलं हे आपण बघत आहोत. दडपशाहीच्या माध्यमातून विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. हे मी नाही तर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कोर्टात संगोतलं होतं. मी ते रिपीट केलं आहे, असंही राऊत म्हणालेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर काही अडचण आहे का?, असंही ते म्हणाले.

राज सुर्वे अटक प्रकरणावर संजय राऊतांनी एका ओळीची प्रतिक्रिया दिली. यावर मी बोलणार नाही, हा कायद्याचा विषय आहे, असं ते म्हणाले.

जळगावमध्ये पत्रकारावर हल्ला झाला. त्यावर जळगावच्या पाचोऱ्यात एका पत्रकारावर हल्ला होतो. तो हल्ला शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का? सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे लोक अशी मारहाण करत आहे हे दुर्देवी आहे, असं राऊत म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.