‘हा’ नेता इंडिया आघाडीमध्ये नाराज; संजय राऊत यांनी ‘अंदर की बात’ सांगितली…

Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut on India Alliance : 'हा' नेता इंडिया आघाडीमध्ये नाराज आहे... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'अंदर की बात' सांगितली... इंडिया आघाडीत कोण आहे नाराज? बैठकीला कोण राहणार हजर? संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

'हा' नेता इंडिया आघाडीमध्ये नाराज; संजय राऊत यांनी 'अंदर की बात' सांगितली...
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 10:23 AM

प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 05 डिसेंबर 2023 : राजधानी दिल्लीत उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीआधी काही नेते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केलं. आहे. उद्या दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे. पाच राज्यातील निकालाच्या आधीच तारीख ठरली होती. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत. महाराष्ट्रातील बाबत यावर चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले. तसंच इंडिया आघाडीतील नाराजीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

‘हा’ नेता नाराज

अखिलेश यादव नाराज आहेत हे मी वाचलं. नितीश कुमार यांची प्रकृती खरंच बिघडली आहे. ममता या पण नाराज आहे असल्याचं ऐकलं. पण आमच्या मित्रपक्षांचे समज गैरसमज लवकरच दूर होतील. काँग्रेसची भूमिका काय असावी यावर पण चर्चा होईल. उद्धव ठाकरे उद्या रात्री दिल्लीत मुक्कामी असतील, असंही राऊत म्हणाले.

उद्या इंडियाची बैठक

उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीला इंडिया आघाडीतील सगळे प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्त्वाची आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार आहे. दोन दिवस असणार दिल्लीत उद्याच्या बैठकीकडे सगळ्याचं लक्ष आहे. इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी नाराज आहेत का?, अशी चर्चा होतेय. उद्या नियोजित कार्यक्रमामुळे ममता बॅनर्जी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जीनी वेगळा वेळ मागितल्याचंही बोललं जात आहे.

बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले…

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बावनकुळे यांनी हे अजित पवार, भाजपने सांगायला पाहिजे. हे लग्न तिघात झालं आहे ते टिकत नसतं… हे दोघात व्हायला हवं होतं… आम्ही महविकास आघाडी म्हणून एकत्र होतो. पण आमचं चांगल सुरू होतं. भाजपचं काहीच नव्हतं तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन शिवसेनेने गावागावात पोहोचवलं. भाजप सुजला, फुगला, मोठा झाला हे कोनामुल हे सगळ्यांना माहित आहे शिवसेनेमुळे भाजप वाढली हे माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.