Navneet Rana : नवनीत राणा यांच्याकडून पुन्हा राज्य सरकारची तक्रार, दिल्लीत घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट
पोलिसांकडून आपल्याला तुरूगांत योग्य वागणूक मिळाली असल्याचा आरोप करत त्यांनी दिल्लीत दाखल होत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. आणि त्यांच्याकडे पोलीस आणि राज्य सराकारची तक्रार केली आहे.
नवी दिल्ली : जेलमधून बाहेर येताच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा हे राज्य सरकारविरोधात आणि शिवेसनेविरोधात चागलेच आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून आपल्याला तुरूगांत योग्य वागणूक (Mumbai Police) मिळाली असल्याचा आरोप करत त्यांनी दिल्लीत दाखल होत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. आणि त्यांच्याकडे पोलीस आणि राज्य सराकारची (Cm Uddhav Thackeray) तक्रार केली आहे. मी ओम बिर्लांना भेटून आली, जे माझ्यासोबत घडलं, ते डिटेलमध्ये सांगितलं, अटकेपासून ते जेलमध्ये कशी वागणूक दिली, तेसगळं सांगितलं. मला अपेक्षा आहे, चेअरपर्सन म्हणून मला ते न्याय देतील. त्यांनी मला तारीख दिली आहे, 23 तारखेला लेखी, तोंडी जबाब नोंद होणार आहे. मुंबई आयुक्त पांडेंविरोधात सगळं सांगितलं आहे, मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर दिली आहे.
मला जे सांगायचं ते सांगितलं
तसेच ज्या ज्या लोकांबद्दल मला सांगायचं होतं, त्या लोकांबद्दल सगळं सांगितलं आहे, लिलावतीबद्दल आपण नंतर बोलू, मला विचारणा करायची असेल तर घरी या, आधी तुमचा रिपोर्ट द्या, मग माझा रिपोर्ट विचारा, महिलेला रिपोर्ट विचारणं तुम्हाला शोभत नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात सध्या हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. तर दुसरीकडून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांच्या उपचावरून अनेक सवाल उपस्थित केले आहे. या आजाराच्या पेशंटला बरे व्हायला तीन महिने आराप करावा लागतो मात्र नवनीत राणा यांच्यावर कोणते उपचार झाले पाहवं लागेल, असेही त्या म्हणाल्या आहेत. तर नवनीत राणा दिल्लीत दाखल होताच त्यांच्या समर्थकांकडून त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला आहे.
नवनीत राणा यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी
खासदार नवनीत राणांनी खोटी तक्रार करून लोकसभा अध्यक्ष व लोकसभेची त्यांनी दिशाभूल केली आहे. त्यामुळे नवनीत राणांवर हक्कभंग आणला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तर नवनीत राणा हनुमान चालीसा घरी किंवा मंदिरात म्हणू शकले असते. मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना कुठून निरोप आला माहित नाही. नवनीत राणा यांना फक्त पब्लिसिटी पाहिजे. त्यांना लोकांचे काही पडलेलं नाही पोलीस स्टेशनमध्ये पाणी मिळालं ही तक्रार त्यांनी केली. जातीच कार्ड त्यांनी वापरलं. पण त्यांचे फोटो चहा पीत बसलेले आहे. त्यांनी दिल्लीत तक्रार करून त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.