Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या जामिनावर बुधवारी निर्णय, वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला!

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आता बुधवारपर्यंत वाढला आहे. कारण आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आता बुधवारी दिला जाणार आहे. आज वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवल्याचं सांगितलं आहे.

Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या जामिनावर बुधवारी निर्णय, वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला!
रवी राणा, नवनीत राणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 10:35 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम आता बुधवारपर्यंत वाढला आहे. कारण राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आता बुधवारी दिला जाणार आहे. आज वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) हा निर्णय राखून ठेवल्याचं सांगितलं आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ट दुसऱ्या प्रकरणांमध्ये व्यस्त होती. तरीही थोडा फार वेळ देत कोर्टानं निकाल वाचनास सुरुवात केली आहे. मात्र वेळेअभावी आज कोर्ट निकाल (Verdict) देऊ शकलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर बुधवारी निर्णय येण्याची अपेक्षा आहे. उद्या रमजान ईदची कोर्टाला सुट्टी आहे. चार तारखेला निकाल वाचन होऊन निर्णय दिला जाईल. पहिल्या सत्रातच कोर्ट निकाल देईल, असं मर्चंट यांनी सांगितलं.

आज कोर्टात नेमकं काय घडलं?

कोर्टाच्या व्यस्त कामकाजामुळे आणि अपुऱ्या वेळेमुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत या प्रकरणाचं निकाल वाचन पूर्ण होईल. न्यायाधीश रोकडे यांचं खंडपीठ हा निर्णय देणार आहे. दरम्यान, शनिवार पासून या निर्णयाचा निकाल प्रलंबित आहे. शनिवारीही वेळेअभावी निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा व्यस्त कामकाज आणि वेळेअभावी या प्रकरणाचा निकाल आता बुधवारी दिला जाणार आहे. आज 3 वाजता या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षीत होतं, पण न्यायाधीश म्हणाले की 5 वाजता निकाल दिला जाईल. 5 वाजता न्यायाधीश रोडके जेव्हा कोर्टात येऊन बसले तेव्हा त्यांनी निकाल बुधवारी दिला जाईल असं सांगितलं. कारण उद्या रमजान ईदची सुट्टी आहे आणि कोर्ट बंद असणार आहे. त्यामुळे नियमित कोर्ट बुधावारी सुरु होईल आणि तेव्हाच राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर निकाल येईल. त्यामुळे आता अजून दोन दिवस राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.

नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास

आज कोर्टात झालेल्या युक्तीवादात नवनीत राणा यांच्या वकिलांनी त्यांना कोठडीत योग्य उपचार मिळत नसल्याचं म्हटलंय. नवनीत राणा यांच्या वकिलांच्या या दाव्याने पुन्हा खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा रक्तदाब वाढल्याच्याही चर्चा सुरू होत्या. मात्र प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. आता रिझवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे की, नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्यांना सीटी स्कॅनची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्या पत्रावर आता जेल प्रशासन काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.