माझा फोन रेकॉर्ड करता? नवनीत राणांनी पोलिसांनाच फैलावर घेतलं, पहा 2 Video, अमरावतीत काय घडलं?

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये पोलीस आणि खासदार नवनीत राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

माझा फोन रेकॉर्ड करता? नवनीत राणांनी पोलिसांनाच फैलावर घेतलं, पहा 2 Video, अमरावतीत काय घडलं?
नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये खडाजंगीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 3:13 PM

अमरावती : तू ठाकरे है तो मै भी राणा हूँ… या शब्दात उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणांनी (Navneet Rana) आज पोलिसांनाच फैलावर घेतलं. अमरावतीच्या पोलिसांनी (Amaravati Police) नवनीत राणांचा फोन कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप केलाय. अमरावतीतून एक मुलगी गायब आहे. लव्ह जिहाद (Love Jihaad) प्रकरणातून अशा मुलीचं अपहरण करून धर्मांतर केलं जातंय, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना फोन केला असता काही मिनिटांनी हा कॉल रेकॉर्ड करण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. पोलिसांनी लोकप्रतिनिधींचा फोन कोणत्या अधिकाराखाली रेकॉर्ड केला, असा सवाल करत नवनीत राणा आक्रमक झाल्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. ही मुलगी काल संध्याकाळपासून गायब आहे. मुलीचा भाऊ खासदार राणा यांच्याकडे बुधवारी सकाळी मदत मागण्यासाठी आला.

बुधवारी सकाळी खा. नवनीत राणा यांनी राजपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना फोन केला. सदर प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. यावेळी ठाकरेंनी हा फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप राणा यांनी केलाय.

व्हिडिओ -1

संतापलेल्या राणांनी थेट राजपेठ पोलीस स्टेशन गाठलं. तेथे पोलीस उपायुक्त विक्रम साळी हेदेखील हजर होते. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे तेथे आल्यानंतर राणांनी त्यांचा फोन मागितला. तुम्ही कुणाच्या आदेशाने माझा कॉल रेकॉर्ड केला, असा सवाल करत आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये पोलीस आणि खासदार नवनीत राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

भारतात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत असून महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असल्याचा दावा नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर केलाय.

व्हिडिओ -2

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.