मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्नावरून खा नवनीत राणा अधिकाऱ्यांवर बरसल्या
अधिकारी काम करत नाहीत आणि जनता आम्हाला दोष देते अशा शब्दात खासदार राणा या संमधीत अधिकाऱ्यांवर बरसल्याचे पाहायला मिळाले.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (Chikhaldara) तालुक्यात असलेल्या खडीमल गावातील पाणी टंचाईचे (water scarcity) भीषण वास्तव आलेला एक धक्कादायक आणि भयानक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर समाज माध्यमातून लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. त्यानंतर आता मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्नावरून खा नवनीत राणा (MP Navneet Rana) अधिकाऱ्यांवर बरसल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आज अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी दिशा समितीची बैठक घेतली. यावेळी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असलेल्या खडीमल गावातील पाणी टंचाईचा मुद्दा समोर आला. तसेच याबैठकीत मेळघाट मधील खडीमलच्या पाणी प्रश्ना खा नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेकर धरले. तसेच अधिकारी काम करत नाहीत आणि जनता आम्हाला दोष देते अशा शब्दात खासदार राणा या संमधीत अधिकाऱ्यांवर बरसल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली. तर खडीमल आणि इतर गावांचा पाणी प्रश्न तातडीने सोडवावा अशा सूचना या बैठकीत खा. नवनीत राणा यांनी संबंधित विभागाला दिल्या.