Navneet Rana Case : नवनीत राणांनी ज्या युसूफ लकडावालाकडून पैसे घेतल्याचा आरोप होतोय तो युसूफ लकडावाला कोण होता?

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा आणि रवि राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाकडून पैसे घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळेच आता राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Navneet Rana Case : नवनीत राणांनी ज्या युसूफ लकडावालाकडून पैसे घेतल्याचा आरोप होतोय तो युसूफ लकडावाला कोण होता?
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:13 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसेवरून गोंधळ सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सर्व गोंधळात नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवि राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणणारच असे म्हटले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केले. दरम्यान हा वाद अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा आणि रवि राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाकडून पैसे घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळेच आता राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे या सारखे अनावश्यक मुद्दे उपस्थित करून राज्य अशांत कसे राहिल हे पाहिले जात आहे. कारण या सर्वांमागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.

कोण आहे युसूफ लकडावाला

युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर होता. लकडावाला याचे दाऊदशी संबंध असल्याचे बोलले जाते. तो डी गँगचा फायनान्सर देखील होता. मनी लॉन्ड्रिंगसह पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीनं त्याला अटक केली होती. आर्थर रोड कारागृहात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान याच युसूफ लकडावालाकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी नवनीत राणा यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र ट्विट करत हा आरोप केला आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा असून, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?

राऊत यांनी नवनीत राणांवर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणांनी डी गँगशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या सर्व प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.