Navneet Rana Video : पती रवी राणा यांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; 12 दिवसांच्या जेलवारीनंतर नवरा-बायकोची रुग्णालयात भेट

आज रवी राणा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर थेत लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी पती रवी राणा यांना पाहिल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना धीर दिल्याचं एक भावनिक चित्र लिलावती रुग्णालयात पाहायला मिळालं.

Navneet Rana Video : पती रवी राणा यांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; 12 दिवसांच्या जेलवारीनंतर नवरा-बायकोची रुग्णालयात भेट
नवनीत राणांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यताImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 6:33 PM

मुंबई : 12 दिवसानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना अखेर बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. नवनीत राणा यांना मानेचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. आज रवी राणा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर थेत लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी पती रवी राणा यांना पाहिल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना धीर दिल्याचं एक भावनिक चित्र लिलावती रुग्णालयात पाहायला मिळालं. दरम्यान, रवी राणा यांनी तळोजा जेल प्रशासनावर (Taloja Jail Administration) गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुरु झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती जेल प्रशासनाला करण्यात आली. मात्र, तरीही त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केलाय.

नवनीत राणांवर लिलावतीमध्ये उपचार सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसाचं पठण करणार असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. शासकीय कामात अडथळासह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर 12 दिवसांच्या जेलवारीनंतर राणा दाम्पत्याला बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, नवनीत राणा यांना मानेचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी नवनीत राणा यांची अवस्था वाईट असल्याचं पाहायला मिळत होतं.

हे सुद्धा वाचा

..आणि रवी राणांना रडू कोसळलं

जामीन मिळाल्यानंतर आज रवी राणा तळोजा कारागृहातून बाहेर आले. त्यावेळी ते थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाले. तिथे भाजप नेते किरीट सोमय्या आधीच उपस्थित होते. त्यांनी आलिंगन देत रवी राणा यांचं स्वागत केलं. त्यानंतर रवी राणा पत्नी नवनीत राणा यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. 12 दिवसांच्या जेलवारीनंतर नवरा-बायकोची भेट झाली. मात्र, त्यावेळी नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं. नवनीत राणा बेडवर होत्या. रवी राणा यांना पाहताच त्यांना रडू कोसळलं. तेव्हा रवी राणा यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

रवी राणांना गंभीर आरोप

पत्नीची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जेल प्रशासनाने आपल्याला आणि नवनीत राणा यांना कशाप्रकारे त्रास दिला याची कैफियत मांडली. तसंच नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.