पतीच्या प्रचाराची धुरा नवनीत राणांच्या हाती

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील विद्यमान आमदार रवी राणा यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी आणि अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana election campaigning for her husband) यांच्याकडे आहे.

पतीच्या प्रचाराची धुरा नवनीत राणांच्या हाती
Follow us
| Updated on: Oct 06, 2019 | 8:44 AM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील विद्यमान आमदार रवी राणा यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी आणि अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana election campaigning for her husband) यांच्याकडे आहे. यासाठी त्यांनी शहरात तसेच ग्रामीण भागात कॉर्नर मीटिंग घेत रवी राणा यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. नवनीत राणा या सकाळपासूनच घरी आलेल्या लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताता. त्यानंतर बडनेरा विधानसभा क्षेत्रात त्यांची प्रचार मोहिम (Navneet rana election campaigning for her husband) सुरु होते.

नवनीत राणा यांच्या घरी सकाळपासूनच लोकांची मोठी गर्दी दिसून येते. शहरातील व ग्रामीण भगातील अनेक समस्या घेऊन लोक राणा यांच्याकडे येतात. त्यांच्या समस्याचं निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न नवनीत राणा करतात. प्रत्येकाला पूर्ण वेळही देतात. सकाळी सामान्य जनतेची व कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे रिघ लागलेली असते. दिवासभराच पूर्ण कार्यक्रम त्यांचा ठरलेला असतो. घरी आलेल्या लोकांची व कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर त्या पतीच्या प्रचारासाठी निघतात आणि मग होतो आपल्या पतीसाठीचा प्रचार सुरु. मागील पंचवर्षिकपेक्षा यावर्षी 80 हजार पेक्षा अधिक मत घेवून रवी राणा निवडून येतील, असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय.

बडनेरा मतदार संघातून दोन वेळा विद्यमान आमदार रवी राणा यांनी विजय मिळवला आहे. आता तिसऱ्यांदाही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महागडीच्या समर्थनार्थ आपल्या युवा स्वाभिमान पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीच्या स्वर्गीय माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांचे तगडे आव्हान आहे. मात्र दहा वर्षात केलेला विकास कामाच्या भरोशावर लोकं मला निवडून देतील, असा विश्वास रवी राणा यांना आहे.

“नवरात्र सुरु असताना मला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. माझ्यामागे एक नारी शक्ती उभी आहे मला भावासारखे प्रेम देत आहे. त्यामुळे मला लोकांशी जनसंवाद करताना एक नवीन ऊर्जा मिळत आहे”, असं आमदार रवी राणा यांनी सांगितले.

दरम्यान, अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी खासदार झाल्यापासून आपल्या मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात केली आहे. दररोज जनतेशी संवाद साधून त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी बडनेरा मतदारसंघात पतीच्या प्रचारासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जनतेशी संवाद साधला आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.