मुंबई – खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांचा रूग्णालयात मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना डिस्चार्ज (Discharge) मिळण्याची शक्यता कमी आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लिलावती रूग्णालयात (Lilawati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मानेला होणाऱ्या त्रासामुळे नवनीत राणा यांना रूग्णालयात अॅडमीट करण्यात आलं होतं. आज त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी हनुमान चाळीसाचे वाचन करण्यासाठी आलेल्या नवनीत राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरूवातीला त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन कोठ़डी देण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना मानेचा त्रास होऊ लागल्याने काल लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बुधवारी जामीन मिळाला. सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. यानंतर नवनीत राणा यांची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. आज सकाळी कारागृहात नवनीत राणा यांची प्रकृतीही बिघडली होती, त्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्य पुन्हा असा गुन्हा करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय ते साक्षीदार किंवा पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत. राणा दाम्पत्य या विषयावर पत्रकार परिषद घेणार नाही किंवा मीडिया किंवा सोशल मीडियावर कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्याचा जामीन रद्द करण्यात येईल.
पोलिसांना 24 तास अगोदर नोटीस द्यावी लागेल
याशिवाय विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांनाही आदेश जारी केले आहेत. राणा दाम्पत्याला चौकशीला बोलावण्या आगोदर पोलिसांना 24 तास अगोदर नोटीस द्यावी लागेल, असे न्यायालयाने सांगितले आहे. याशिवाय राणा दाम्पत्याला तपासात सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.