नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही खास फोटोंची चर्चा होती. हे फोटो साधेसुधे नव्हते तर हे फोटो अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Naveet Rana), आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लडाखमधील (Ladakh Tour) भेटीचे होते. या दौऱ्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि रवी राणा एकत्र नाष्टा करताना, एकत्र गप्पा मारताना, फिरताना दिसून आले. राज्यात काही दिवसांपूर्वी एकमेंकांवर तुटून पडणारे नेते असे भेटल्याने चर्चेला उधाण आले होते. कारण काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा संजय राऊतांना पोपट म्हणत होत्या तर संजय राऊत नवनीत राणा आणि रवी राणा यांना बंटी बबली म्हणत होते. मग खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले.
नवनीत राणा म्हणाल्या, मला वाटतं माझी लढाई हे माझे विचार आहेत. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला अन्याय तर माझ्यावर झाला आहे. तरी मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत . त्याविरोधात मी लढत राहणार आहे. तसेच मी त्यांच्याबद्दल जे काही बोलले आहे, त्यावर मी आजही कायम आहे. त्यांनी माझ्या मुलांशी त्यांनी संवाद साधला, असेही त्यांनी सांगितले.
तसेच 23 तारखेला संसदीय समितीपुढे आम्ही जाणार आहोत. माझ्यासोबत महाराष्ट्रात जे घडलं, जो अन्याय झाला. त्याच्याविरोधात मी जाऊन माझा हक्क बजावणार आहे. जे माझ्या विरोधात बोलते त्याच्या सर्वांबाबत मी साक्ष देणार आहे. संजय राऊतांसमोर मला एका मुलीने विचारलं की मुलींना पुढे का येऊ दिलं जात नाही. त्यावेळी मी बोलले की मी आली आहे जेलमध्ये जाऊन, मला जेलमध्ये टाकणारे लोक इथेच बसले आहेत. त्यावर संजय राऊतांकडे काहीच उत्तर नव्हतं. ते फक्त हसले, असेही नवनीत राणा यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी वारंवार हनुमान चालीसाचा अपमान करणे, संजय राऊतांनी बेताल वक्तव्यं करणे, याबाबत मीही त्यांना विचारलं होतं की आम्ही कोणता गुन्हा केला होता की आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यावर संजय राऊतांकडे काही उत्तर नव्हतं. आपल्या राज्यातली कोणती व्यक्ती बाहेर भेटल्यावर आम्ही संस्कृती जपण्याचं काम केलं.