Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, हनुमान चालीसा म्हणाल तर याद राखा! धमकी देणारा कोण?

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालीसा म्हणटल्यास तुम्हाला ठार मारू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे.

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, हनुमान चालीसा म्हणाल तर याद राखा! धमकी देणारा कोण?
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नवनीत राणांचे बॅनरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 6:11 PM

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या चर्चेत राहिल्या आहेत. मात्र त्यांच्याबाबत आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कारण खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणटल्यास तुम्हाला ठार मारू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे. एका मुस्लिम धर्मगुरू कडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली आहे. नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तशी तक्रार त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार नवनीत राणा या हनुमान चालीसा पठणावरून वादात सापडल्या आहेत. याचवरून त्यांना जेलवारीही करावी लागली आहे.

धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही

खासदार नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा  यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची अज्ञाताने धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. आता पुन्हा या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या वेळी धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते. मात्र, या प्रकाराची दखल घेत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपल्या तक्रारीत त्यांनी हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा त्यांनी गेल्या वेळी केला होता. आता मात्र तसा कोणताही दावा त्यांच्याकडून करण्यात आला नाही.

हनुमान चालीसा पठणावरून राणांची जेलवारी

गेल्या काही दिवासांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या बाहेरच हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला होता. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. हा वाद एवढा वाढला की नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये जावं लागलंं. त्यानंतर नवनीत राणा यांनी या प्रकरणाची दिल्लीपर्यंत तक्रार केली. आणि आता पुन्हा हनुमान चालीसा पठणावरूनच राणा यांना धमकी आल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजली आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती काय लागतंय. यावरूनही बरेच काही अवलंबून असेल.

हे सुद्धा वाचा
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.