Navneet Rana | तू ठाकरे है तो मै राणा हूँ…. कितनी ताकद है… नवनीत राणांनी ‘भक्ती’ ठणकावून सांगितली

आम्ही मोदी भक्त आहोत, असं नवनीत राणा यांनी जळगावात ठणकावून सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कुटुंबासाठी काही करत नाहीत तर देशातील नागरिकांसाठी निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही मोदी भक्त आहोत, हे गर्वाने सांगतो, असं नवनीत राणांनी म्हटलं.

Navneet Rana | तू ठाकरे है तो मै राणा हूँ.... कितनी ताकद है... नवनीत राणांनी 'भक्ती' ठणकावून सांगितली
नवनीत राणा, खासदार, अमरावतीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 12:36 PM

जळगावः पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) लाट नव्हती, तेव्हापासून आम्ही मोदी भक्त आहोत. हनुमान भक्त आहोत. आमच्या भक्तीला चॅलेंज करायचं नाही, याच आशयाचा इशारा नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिलाय. जळगावात गणेश मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी त्यांच्या हनुमान चालिसाच्या आंदोलनाचा प्रसंग सांगितला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी कसं रोखलं आणि त्यावर आपल्या ‘भक्ती’ने कशी मात केली, याचं वर्णन नवनीत राणा यांनी केलं. तू ठाकरे है तो मै भी राणा हूँ, मुंबई की बेटी और विदर्भ की बहूं हू.. देखते है किसमे कितनी ताकद है… असा इशारा देत आम्ही हनुमान चालीसाचा आग्रह धरल्याचं राणा यांनी कार्यक्रमात सांगितलं.

हमुमान चालिसाचा हट्ट का?

हनुमान चालीसाचा हट्ट का धरला होता, हे स्पष्ट करताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘ महाराष्ट्राच्या विकासासाठी, राज्यावरचं संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हुनमान चालिसाचं पठण केलं पाहिजे, अशी मी विनंती केली होती. पदाने, वयाने मोठे आहेत, म्हणून मी हात जोडून विनंती केली होती की हनुमान चालीसा पठन करा… त्यांनी केला नाही म्हणून आम्ही हनुमान चालिसा म्हणण्याचं ठरवलं. पण उद्धव ठाकरेंनी धमकी दिली, ज्या पायाने तुम्ही आलात, त्या पायाने वापस जाणार नाहीत….

राणांनीही ठणकावलं..

उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मीसुद्धा ठणकावून सांगितलं, हा प्रसंग सांगताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘ पण मीही सांगितलं मै मुंबई की लडकी हू और विदर्भ की बहू हूं, इतनी कमजोर नही.. तू शिवसेना वाला है, तू उद्धव ठाकरे है, तो मै भी राणा हूँ.. .मै विदर्भ की बहू  हूं, तुम्हारे मे कितनी ताकद है.. और मुझमें कितनी… आमना सामना होही जाएगा.. वो किया भी सर हमने…

आंदोलन मागे घेतलं, तरीही कारवाई…

ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान मुंबईत येणार होते, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही आमचं आंदोलन वापस घेतलं. उगाच कार्यक्रमांमध्ये आंदोलनाचा व्यत्यय नको म्हणून.. दुपारी 3 वाजता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी पॉवरचा वापर करत जे करायचं तेच केलं, असा राणांनी सांगितलं.

अशी ताकद दाखवली…

हनुमान चालिसाला त्यांनी विरोध केला. आम्हाला जेलमध्ये टाकलं. पण मी तुरुंगात 12-12 तास हनुमान चालिसाचं पठण केलं. त्यांना वाटलं ही महिला जेलमध्ये टाकल्यावर काही बोलणार नाही. पण माझ्या भक्तीची ताकद दाखवली. त्यांच्या घरात उभा राहणारा कार्यकर्ताच उरला नाही.. अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंच्या स्थितीवर टीका केली.

आम्ही मोदी भक्त आहोत…

आम्ही मोदी भक्त आहोत, हेदेखील नवनीत राणा यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कुटुंबासाठी काही करत नाहीत तर देशातील नागरिकांसाठी निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही मोदी भक्त आहोत, हे गर्वाने सांगतो, असं नवनीत राणांनी म्हटलं.

‘नवनीत राणा जरा तोंड सांभाळून…’

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होईल, असं वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा यांनी तोंड सांभाळून बोलावं, असा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला आहे. कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते. तुमच्यासारख्या 100 जणांच्या छाताडावर उभी राहून मुंबईवर भगवा फडकेल, असा इशारा घाडी यांनी दिला.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.