नवाब मलिकांना आता मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, चंद्रकांत पाटील यांची आक्रमक मागणी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांना आता मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, चंद्रकांत पाटील यांची आक्रमक मागणी
नवाब मलिक, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 4:31 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (Enforcement Directorate) अटक करण्यात आली आहे. मलिक यांची ईडीकडून सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने मलिकांना अटक केली आहे. गुन्हेगारी दाऊद गँग संदर्भात चौकशी सुरु असताना नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आता नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. एक तर आहेत. एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला. एका नेत्याचं अनधिकृत रिसॉर्ट आहे. एका मंत्र्याला दोन पत्नी आहे. किती मोठी यादी आहे. हे काय चाललं आहे? सगळं कोलमडलं आहे, अशी टीका पाटील यांनी केलीय.

चंद्रकांत पाटील यांचं सरकारला आव्हान

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावलाय. पुढचा नंबर माझा लावा यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. नंतर चांगली कोठडी मिळणार नाही म्हणून यात कुणाला सुडाचं राजकारण सुरु आहे असं वाटत असेल तर त्यांनी त्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हान पाटील यांनी दिलंय.

लढेंगे और जितेंगे, मलिकांची पहिली प्रतिक्रिया

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. नवाब मलिक यांचं जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.

इतर बातम्या :

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया…

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.