मुंबई : “सामना वर्तमान पत्राला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सामना हा सेनेशी सलग्न असलेले वर्तमानपत्र आहे. त्यामुळे हा वाद निर्माण करणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा करुन सर्वांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे असा प्रकार झाला असे वाटत नाही,” असे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशा गौप्यस्फोट रोखठोकमधून करण्यात आला आहे. (Nawab Malik on shivsena anil deshmukh home minister appointment)
“लोकशाहीत एखाद्या वर्तमानपत्राला विश्लेषण करणे, मत मांडणे हे त्यांचे अधिकार आहे. सामना हे शिवसेनेशी संलग्न आहे. त्यामुळे जे वर्तमानपत्र अधिकार आहे. त्या अधिकाराखाली त्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल किती सत्यता आहे. हे मला माहिती नाही. पण पवारांनी चर्चा करुन ही जबाबदारी नीट वाटून दिली आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले.
एकत्र लढायचं की वेगवेगळं, ते ठरेल
“राजकीय परिस्थिती पाहून पुढे निवडणुका होणार आहे. एकत्र लढायचं की वेगवेगळं ते ठरेल. काही ठिकाणी भाजपच गिणतीतच नाही. त्यांना रान मोकळं कशाला करुन द्यायचं,” असेही नवाब मलिकांनी सांगितले.
विषय गंभीर आहे, सखोल चौकशी होईल
“रश्मी शुक्लाप्रकरणी संभ्रम निर्माण होताना फडणवीस यांच्या मनात भिती निर्माण झाली की नाही हे मला माहिती नाही. हा अहवाल निराधार होता. त्यामुळे खुलासा करणं आमची जबाबदारी होती. तपासातून सगळं बाहेर येईल, गुन्हा दाखल झाला आहे. ऑफिसर सिक्रेट अॅक्टचा प्रश्न आहे. सखोल चौकशी होईल. गंभीर विषय आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले.
कोरोनाचं राजकारण होत नाही. पण टेस्टिंग वाढवल्याने नंबर वाढत आहेत. देशात कोरोनाला लोक गांभिर्याने घेत नाही. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इथे टेस्टिंग होत नाही. आम्ही केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करतो आहे. नंबर वाढत असेल पण औषधपचार करण्याचे काम सुरु आहे. सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात होत आहे. लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले.
अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद अपघाताने
देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.
अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे. (Nawab Malik on shivsena anil deshmukh home minister appointment)
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंना कणा नाही, राज्यात नवीन सरकार आलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर
…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवले, शिवसेनेचा गौप्यस्फोट