शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही : नवाब मलिक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा ठरलेल्या भाजला सत्तास्थापनेविषयी विचारणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना (Nawab Malik on supporting Shivsena) वेग आला आहे.
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा ठरलेल्या भाजला सत्तास्थापनेविषयी विचारणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना (Nawab Malik on supporting Shivsena) वेग आला आहे. एकीकडे भाजपने कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी (Nawab Malik on supporting Shivsena) शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.
नवाब मलिक म्हणाले, “शिवसेनेकडून अद्याप आम्हाला कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर विचार करू. 12 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून यात त्यांचं म्हणणं ऐकून निर्णय घेतला जाईन. जो निर्णय घ्यायचा तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितच घेणार आहेत.”
दरम्यान, शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे.
दुसरीकडे, शिवसेनेने आपलं सरकार स्थापन करण्याचा नारा दिल्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार, की शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी वारंवार होते. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवडलेले गेलेले एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते. परंतु आता उद्धव ठाकरेंच्या नावाचे पोस्टर्स लावलेले दिसत (Uddhav Thackeray wants Shivsena CM) आहेत.
शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अखेर हिरवा कंदिल दाखवल्याची चर्चा आहे. जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा सूर निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडच्या कानावर घातला जाणार आहे. परंतु काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधीच यावर अंतिम निर्णय घेतील. मात्र भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.