निवृत्त न्यायाधीशांच्या समितीवर प्रश्नचिन्ह म्हणजे फडणवीसांची दुतोंडी भाषा : नवाब मलिक

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाबाबत देवेंद्र फडणवीस दुतोंडी भाषा वापरत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

निवृत्त न्यायाधीशांच्या समितीवर प्रश्नचिन्ह म्हणजे फडणवीसांची दुतोंडी भाषा : नवाब मलिक
Nawab Malik and Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:03 PM

मुंबई : “तुम्ही नवी मुंबईतील भतीजाच्या एका 300 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली. त्यावेळी ती चांगली होती. आता आमच्या सरकारने गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात, हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलंय (Nawab Malik criticize Devendra Fadnavis over Anil Deshmukh investigation committee).

आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी केलेल्या आरोपावर सरकारने एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केलीय. या समितीला कोणतेही अधिकार नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची ही समिती 6 महिन्यात आरोपांची चौकशी करुन अहवाल सरकारला सादर करेल.

देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते.”

“अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही.आता प्रश्न निर्माण होतो,तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?” असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

हेही वाचा :

‘खडसेंच्या चौकशीवेळी मी झोटिंग समितीला सर्व अधिकार दिले होते, पण अनिल देशमुखांची चौकशी निव्वळ धुळफेक’

फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सरकारने एक दिवसआधीच जनतेला एप्रिल फूल बनवले, भाजपची टीका

व्हिडीओ पाहा :

Nawab Malik criticize Devendra Fadnavis over Anil Deshmukh investigation committee

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.