चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानामुळे गजहब, राष्ट्रवादीकडून थेट अटलजींच्या ‘राजधर्माची’ आठवण
राष्ट्रवादीने भाजपला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजधर्म पाळण्याच्या सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. (Nawab Malik Chandrakant Patil Abdul Kalam)
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम (Abdul Kalam) यांना राष्ट्रपती केलं”, असं अजब विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची दखल घेत राष्ट्रवादीने त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजधर्म पाळण्याच्या सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. “अब्दूल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यात नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) सहभाग नव्हता, उलट त्यावेळी अटलजी मोदींना राजधर्म काय याचा धडा शिकवत होते,” असा टोला अल्पसंख्याक नेते आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. (Nawab Malik criticizes Chandrakant Patil for commenting on Abdul Kalam)
“कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते,” अशी टिप्पणी नवाब मलिक यांनी केली.
यावेळी बोलताना त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्यावेर भाष्य केले. “आम्ही ऊद्यापासून जनता दरबारही रद्द करण्याचा घेतला आहे. मात्र, भाजपकडून राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येनं घेतले जात आहेत. लॉकडूनमध्ये विरोधकांनी हे ऊघडा ते ऊघडा अशी मागणी केली. आता ते उलटा आरोप करत आहेत,” असे मलिक म्हणाले.
मोदी सरकार राहणार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नुकतंच सीएए हा कायदा लागू करणार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना मलिक भाजपची सत्ता जास्त काळ टिकणार नसल्याचं म्हटलंय. “अमित शाह सांगतात की लसीकरणानंतर सीएए कायदा लागू केला जाईल. पण ज्या गतीने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे; ते पाहता हा कार्यक्रम आणखी 5 वर्षे पूर्ण होणार नाही. आगामी काळात पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शाह असे विधान करत आहेत,” असे मलिक म्हणाले. तसेच लसीकरण संपेपर्यंत मोदी सरकार टीकणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
पुण्यातील युवा वॉरियर्स अभियानात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भेशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं सांगितलं. तसंच आपला सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं सांगितलं. मात्र काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.
Video : चीनचा कांगावा सुरुच, गलवान खोऱ्यातील व्हिडीओ शेअर करत भारतावर घुसखोरीचा आरोपhttps://t.co/PTthpGDtFn#india | #china | #Indiachinafaceoff | #GalwanValley
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
इतर बातम्या :
नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा
(Nawab Malik criticizes Chandrakant Patil for commenting on Abdul Kalam)