5 वर्ष मुख्यमंत्रिपद कोणाकडे? नवाब मलिकांच्या उत्तराने चर्चांवर पडदा पडला

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेना सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच (Nawab Malik on CM) असेल हे सुद्धा ठरलं आहे.

5 वर्ष मुख्यमंत्रिपद कोणाकडे? नवाब मलिकांच्या उत्तराने चर्चांवर पडदा पडला
Follow us
| Updated on: Nov 22, 2019 | 10:06 AM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेना सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच (Nawab Malik on Maharashtra CM) असेल हे सुद्धा ठरलं आहे. मात्र शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद किती वर्षांसाठी असेल याबाबत जे तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावरही पडदा पडला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik on Maharashtra CM) यांनी “5 वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, आम्ही पाठींबा देऊ” असं स्पष्ट केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

“मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उत्तम, ते सरकारचा चेहरा ठरु शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असेल, आम्ही पाठींबा देऊ”, असं नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले, “सत्तासंघर्ष संपला आहे. आज 4 वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की दोन दिवसांत राज्यपालंकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे.”

किमान समान कार्यक्रमाचा अजेंडा आज फायनल होईल. दोन दिवसात गुड न्यूज मिळेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्या केवळ चर्चाच आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं नवाब मलिक म्हणाले.

महारष्ट्रात आघाडी करताना नवं नाव ठरवू. युती केल्यानंतर पक्षाचं नाव ठेवण्यात येत नाही. हे थोतांड मीडियानं पसरवलं आहे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.

सरकार धर्मनिरपेक्ष असेल, महाराष्ट्राला विकास हवा आहे. पवारांनी दिल्लीच्या चाणक्यला दाखवून दिलं की नाद करायचा नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी अमित शहांवर निशाणा साधला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.