पाच वर्ष सत्तेची मस्ती, भाजप हवेतील पक्ष, आमचे नेते जनतेतील, नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला

स्वप्न पाहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मात्र भाजप यशस्वी होणार नाही, असंही नवाब मलिक म्हणाले

पाच वर्ष सत्तेची मस्ती, भाजप हवेतील पक्ष, आमचे नेते जनतेतील, नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 3:53 PM

मुंबई : “पाच वर्ष ज्यांना सत्तेची मस्ती होती, ते आज बोलतात. आमचे नेते जनतेतील आहेत, भाजप हा हवेतील पक्ष आहे, ते हवेतच राहतील” असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारला मस्ती आल्याबाबत फडणवीसांनी केलेल्या टीकेला मलिक यांनी उत्तर दिले. (Nawab Malik slams BJP leader Devendra Fadnavis)

राज्यभरात होत असलेल्या विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांना (Vidhan Parishad Graduate and Teacher Constituency Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रित सामोरी जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करु. पालकमंत्री आणि संपर्कमंत्री यांची ती प्रामुख्याने जबाबदारी राहील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

स्वप्न पाहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. भाजप यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचा प्रयत्न करेल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

कोरोना संकटामुळे बजेट कमी झालं आहे. खर्चात कपात केली आहे. काही विभागांना पैसे मिळत नाहीत, ही वस्तु्स्थिती आहे. माझ्या विभागाला पैसे मिळावे, ही सर्वांना अपेक्षा असते. जिथे आवश्यकता आहे, तिथेच निधी वाटप केला जातो, असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी खदखद व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

थोरात काय म्हणाले होते?

बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. (Nawab Malik slams BJP leader Devendra Fadnavis) आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या :

आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद

बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल

(Nawab Malik slams BJP leader Devendra Fadnavis)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.