आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात; नवाब मलिकांचा फडणवीसांवर घणाघात

राज्य सरकार योग्य फॉरमॅटमध्ये केंद्राकडे मदत मागत नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात; नवाब मलिकांचा फडणवीसांवर घणाघात
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 10:00 PM

परभणी : राज्य सरकार योग्य फॉरमॅटमध्ये केंद्राकडे मदत मागत नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याबद्दल अधिकारच उरलेला नाही, असा टोला मलिक यांनी लगावला आहे. (Nawab malik slams devendra fadnavis over Farmers help package)

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक सध्या जिल्ह्याच्या वर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राज्याबद्दल बोलण्याचा अधिकारच उरला नाहीये.

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते असताना बिहारमध्ये जाऊन म्हणतायत की, ‘बिहारवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रेम आहे’. ते महाराष्ट्राबाबत दुजाभाव करतात. आता ती वेळ राहिली नाही. हाफचड्डी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात एक बोलायचं, असं चालणार नाही. आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात, असा घणाघात मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, मलिक यांनी आज सेलू मानवत तालुक्यातील चार ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर त्यानी कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं.

मलिक म्हणाले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने पक्षाला त्याचा फायदाच होणार आहे. ते कोणतीही अभिलाषा ठेऊन पक्षात आलेले नाहीत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार जी काही जबाबदारी त्यांच्यावर सोपवतील ती जबाबदारी निभावण्यासाठी खडसे तयार आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत बोलताना मलिक म्हणाले की, केंद्र सरकार राज्याला जीएसटी देत नाहीये, एनडीआरएफनुसार राज्याला मदत ही करीत नाहीये. 10 हजार कोटी रुपयांची मदत द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत, पण तितकी मदत देण्याची आमची इच्छा आहे. यासाठी सरकारला कर्ज काढावं लागेल.

संबंधित बातम्या

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच चंद्रकांतदादांची टीका; खडसे-पाटील जुंपली

(Nawab malik slams devendra fadnavis over Farmers help package)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.