मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असणार मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर किडनी (Kidney) आणि इतर व्याधींबाबत उपचार होणार आहे. एका जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक सध्या जेलमध्ये आहेत. मलिक यांना सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर सध्या उपचाराची गरज आहे, त्यामुळे त्यांना खासग रुग्णालयात दाखल करण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी ईडी कोर्टात करण्यात होती. त्यानंतर ईडी कोर्टाने त्यांना ही परवानगी दिल्याने मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांची प्रकृती पूर्ण बरी नसून त्यांना बराच त्रास होत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नवाब मलिक यांच्यावरून राज्याच्या राजकारणात अजूनही जोरदार घमासान सुरू आहे. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर ही कारवाई सूडबुद्धीने आणि भाजपच्या सांगण्यावर करण्यात आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते कर आहेत. राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री जेलमध्ये गेल्याने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. नवाब मलिक यांनी गैरव्यववहार केला आणि तो पैसा थेट दाऊदकडे गेले. त्यामुळे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्याला अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय.
नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे. तर दुसरीकडे भाजप यावरून जोरदार टीका करत आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच वर्क फ्रॉम जेल सुरू आहे. या सरकारने खेळ लावला आहे, या सरकारला लाज उरली नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठिणग्या उडत आहेत.
नवाब मलिक यांच्याकडील पदभार दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आलाय. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पदभारही दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात येईल, तसेच तब्येतीच्या कारण देत त्यांच्या जामिनासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.