नवाब मलिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता, ईडीकडे नवी तक्रार
नवाब मलिकांना ईडीने सकाळी त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांनी कोठडी मागितली. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या विरोधात धरण आंदोलन केलं.
मुंबई – नवाब मलिकांना (nawab malik) ईडीने (ED) ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नवाब मलिकांनी गुन्हा केल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करीत असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून त्यांची चौकशी सुरू आहे. गोवावाला कम्पाउंड जागेच्या सोबतच आणखी एका जागेवरुन मलिकांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल झाली आहे. मलिकांच्या अटकेनंतर एका जेष्ठ नागरिकाने केली ईडीकडे तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे. त्या ज्येष्ठ नागरिकाने तक्रारीत नवाब मलिकांवरती अनेक आरोप केले आहेत.
काय आहे नव्या तक्रारीत
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने फक्त घोटाळे केले असल्याचे आरोप केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांच्यावरती जागेच्या खरेदीचा आरोप केल्याने त्यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या आणखी चौकशी करण्यासाठी त्यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाल्याची पाहायला मिळत आहे. ही तक्रार एका वयोवृध्द व्यक्तीने केली असून त्यांमध्ये त्यांनी एका जागेवर मलिकांनी जबरदस्तीने कब्जा केला असल्याचे तक्रारीत म्हणटले आहे. पुर्वी या व्यक्तीने मलिकांच्या विरोधात तक्रार केली होती. परंतु त्यावेळी काहीचं झालं नाही म्हणून सध्या ज्येष्ठ नागरिकाने ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. ईडीने त्यांची तक्रार नोंद केली असून त्यासंदर्भातले सगळे पेपर त्यांनी जमा केल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातलं राजकारण तापलं
नवाब मलिकांना ईडीने सकाळी त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांनी कोठडी मागितली. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या विरोधात धरण आंदोलन केलं. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केलं. भाजपाकडून नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून निषेध नोंदविला गेला. तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अत्यंत तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.