माणिकराव ठाकरेंना मी रसद पुरवली, आता कार्यकर्ते नाराज : संदीप बाजोरिया

यवतमाळ: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाआघाडीत बिघाडीचं चित्र आहे. कारण इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे विश्वासात घेत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप बाजोरिया यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप बाजोरीया यांनी […]

माणिकराव ठाकरेंना मी रसद पुरवली, आता कार्यकर्ते नाराज : संदीप बाजोरिया
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

यवतमाळ: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाआघाडीत बिघाडीचं चित्र आहे. कारण इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे विश्वासात घेत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप बाजोरिया यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप बाजोरीया यांनी याबाबत टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया दिली. “सध्या निवडणूक तोंडावर आली आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत काम करावे. मात्र काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारात घेत नाहीत. त्यांना प्रचारसभेत बोलवतं नाहीत. मी 2009 पासून काँग्रेसचे विजय दर्डा ते माणिकराव ठाकरे यांना निवडणुकीदरम्यान रसद पुरवण्याचे काम केलं आहे. मात्र आता माणिकराव ठाकरे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारात घेत नसल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मी स्वत: आघाडीधर्म पाळणार असलो तरीही माझे कार्यकर्ते याबाबत काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत” असे संदीप बाजोरिया म्हणाले.

त्यामुळे यवतमाळ-वाशिम मतदारसंघात माणिकराव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सध्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघामधून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी आणि प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत होणार आहे. गेली अनेक वर्षे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकांपासून शिवसेनेने काँग्रेसच्या  बालेकिल्लाला खिंडार पाडत शिवसेनेचा गड केला आहे. त्यामुळे यंदाची वाशिम-यवतमाळ लोकसभा निवडणूक चांगलीच रंगणार आहे.  येत्या 11 एप्रिल रोजी यवतमाळी-वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.