पवारांच्या सभेनंतर घसा ओला करण्यासाठी कार्यकर्ते थेट धाब्यावर
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठिकठिकाणी जात आहेत. बीडमध्ये त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली. मात्र, भर उन्हात सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी चक्क धाबे गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याची तहान दारुवर भागवल्याचे पाहायला मिळाले. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आष्टी येथे शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आज ‘ड्राय […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठिकठिकाणी जात आहेत. बीडमध्ये त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली. मात्र, भर उन्हात सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी चक्क धाबे गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याची तहान दारुवर भागवल्याचे पाहायला मिळाले. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आष्टी येथे शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आज ‘ड्राय डे’ असल्याने जिल्ह्यातील सर्वच दारु दुकाने आणि बिअर बार बंद होते. मात्र, बीडमध्ये विविध ढाब्यांवर सर्रास दारू विक्री होताना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खुलेआम उघड्यावर बसून दारू पिताना दिसून आले.
‘कुलभुषण यांना सोडून आणा, अन् 56 इंचाची छाती दाखवा’
दरम्यान, बीडमधील आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच मतांच्या राजकारणासाठी सैन्याचा उपयोग होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. आपले 40 जवान शहीद झाले, तेव्हा तुम्ही 56 इंचाची छाती तपासली का? असा प्रश्न विचारत पवारांनी पंतप्रधान मोदींना चांगलेच धारेवर धरले. कुलभूषण जाधव अडीच वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे. त्यांची सुटका करून 56 इंचाची छाती दाखवा, असेही आव्हान यावेळी पवारांनी मोदींना दिले.
‘गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे प्रभावीपणे पुढे नेत आहेत’
गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे अत्यंत प्रभावीपणे पुढे नेत असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले. तसेच मोदींच्या पवार कुटुंबीयांवरील टीकेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी माझ्या घराची चिंता करू नये. ते एकटे आहेत, परंतु माझं घर भरलेलं आहे, असा उपरोधात्मक टोला लगावला. दरम्यान यावेळी मोदीजी हे वागणं बरं नव्ह..! असे म्हणून पवारांनी मोदींची चांगलीच खिल्ली उडवली.