Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्यसंस्थांसह 10 विधानसभा लक्ष्य

राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी या आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी काँग्रेसने खूप आधीपासूनच स्वबळावर बोलायला सुरुवात केली. मात्र, आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळाची भाषा बोलतोय.

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्यसंस्थांसह 10 विधानसभा लक्ष्य
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 9:18 AM

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी या आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी काँग्रेसने खूप आधीपासूनच स्वबळावर बोलायला सुरुवात केली. मात्र, आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळाची भाषा बोलतोय. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळाचा नारा देणारं सूतोवाच केलंय. आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला अस समजून कामाला लागा, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. ते कोल्हापुरात आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलत होते. शाहू सभागृहात ही बैठक पार पडली.

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देताना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह 10 विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्ता आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला अस समजून कामाला लागा असे सूतोवाच केलेत. मुश्रीफ यांनीच पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यानं आता कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढलाय. या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

राज्यात स्वबळावर लढण्याच्या राहुल गांधींच्या सूचना : नाना पटोले

महाराष्ट्रात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन सगळ्यांना करावं लागतं, त्यामुळे सगळे नेते त्यासाठी तयार आहेत. राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सांगितले. तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचेही पटोले म्हणाले.

नाना पटोले स्वबळावर काय म्हणाले?

आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत, निवडणुकीला अजून तीन वर्ष आहेत. आम्ही बोललो आहे, शब्द दिलाय माघार घेणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

ओबीसी आरक्षण हटविण्याचे पाप हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे आहे. आता तेच जनतेची दिशाभूल करत आहेत, ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही नाना पटोलेंनी दिली.

अमरावतीत नाना पटोले काय म्हणाले होते?

नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी स्वबळाची घोषणा केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. नाना पटोले मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत होते. त्यावेळी त्यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं होतं.

भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं होतं.

हेही वाचा :

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

कोरोनामुळे 15 ऑगस्टची ग्रामसभा होणार की नाही? ग्रामविकास मंत्र्यांचा पहिल्यांदाच स्पष्ट आदेश, गोंधळ मिटला

विकासकामात अडथले आणू नका, नितीन गडकरींच्या पत्रानंतर हसन मुश्रीफांचं स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन

व्हिडीओ पाहा :

NCP also may fight upcoming election Independently Hasan Mushrif in Kolhapur

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.