मुख्यमंत्रीसाहेब, हे बरोबर नाही! मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत बैठक, आम्हा लोकप्रतिनिधींनाच आमंत्रण नाही-अमोल कोल्हे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाही पद्धतीचा नवा दुर्दैवी पायंडा पाडत आहेत, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लोकशाही पद्धतीचा नवा दुर्दैवी पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली. या बैठकीला लोकांनी निवडून दिलेले खासदार, आमदार यांना आमंत्रण नव्हतं. हा लोकशाहीचा अपमान आहे, हे खेदपूर्वक म्हणावं लागत आहे. केवळ राजकारण न करता शाश्वत विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन इथं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असं खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहेत.