पंढरपूर : “भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने बाजी मारली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विजय झाला. यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत याबाबतची प्रतिक्रिया दिली. (NCP Amol Mitkari Tweet about Pandharpur mangalwedha bypoll result 2021)
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले, असे ट्वीट अमोल मिटकरींनी केले आहे.
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले. pic.twitter.com/TcMxkbSmQL
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 2, 2021
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल (2 मे) पार पडली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1 लाख 09 हजार 450 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 05 हजार 717 मत मिळाली. अवघ्या 3733 मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.
(NCP Amol Mitkari Tweet about Pandharpur mangalwedha bypoll result 2021)
संबंधित बातम्या :
Abhijit Bichukale | अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं