पवार काय बोलत आहेत त्यावर बोलणार नाही, पण तिघांशी बोलून निर्णय-पटोले

प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. जे कोणी यासाठी काम करत असतील, त्यांना चुकीचं ठरवता येणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले. | Nana Patole

पवार काय बोलत आहेत त्यावर बोलणार नाही, पण तिघांशी बोलून निर्णय-पटोले
नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 9:13 PM

मुंबई: विधानसभा अध्यक्षपद सोडण्यापूर्वी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना या निर्णयाची पूर्णपणे कल्पना होती, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे. (Nana Patole on assembly speaker resignation decision)

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी त्यांनी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. जे कोणी यासाठी काम करत असतील, त्यांना चुकीचं ठरवता येणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती मिळतेय. खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबाबत नापंसती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थिर होत असतानाच त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे कळते.

‘मी मुळचा काँग्रेसी, काही दिवसांच्या वनवासाचा पश्चाताप होतोय’

मी मुळचा काँग्रेसीच आहे, काही दिवसांच्या वनवासाचा मला पश्चाताप होत आहे. आता माझ्याच घरात मला कोणी बाहेरचा म्हणत असेल तर मी त्यावर बोलणार नाही. मी पक्षाच्या सांगण्यावरूनच राजीनामा दिला. आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून चांगलेच काम केले. यापुढेही संघटनेची जबाबदारी मिळाल्यास तीदेखील चांगल्या पद्धतीने पार पाडेन, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

काँग्रेस पक्ष मला देईल ती जबाबदारी मी पार पाडेन. उपमुख्यमंत्रीपद आणि इतर खात्यांबाबत सगळे मिळून निर्णय घेऊ. आगे आगे देखो, होता है क्या, असा इशाराही नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये चलबिचल; नेते पवारांना भेटण्याची शक्यता

नाना पटोले यांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा अध्यक्षपदावर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

महाविकासआघाडीत काही खात्यांची अदलाबदल होणार असल्याच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. यामध्ये आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाची निर्मिती करून ते काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या सगळ्याविषयी काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ चांगली खाती पदरात पडणार असतील तरच काँग्रेसचे नेते या चर्चेला तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित बातम्या:

विधानसभा अध्यक्षपदाबाबत पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये चलबिचल; नेते पवारांना भेटण्याची शक्यता

पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

(Nana Patole on assembly speaker resignation decision)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.