“फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज, सत्ता गेल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळलं”
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. (Anil Gote allegation Devendra Fadnavis)
मुंबई : “माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढळत चालले. फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत. (NCP Anil Gote allegation on Devendra Fadnavis)
तुमच्याकडे दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी झाली का?
“देवेंद्र फडणवीसांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करा. सत्ता हिरावल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे.फडणवीस सरकारमधील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का? फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाटलेल्या नोटा वर्षावर छापल्या होत्या का? फडणवीसांच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीवरुन नुसती नजर फिरवली तरी सर्व लक्षात येईल. आपल्याकडे केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का?” असा सवाल अनिल गोटे यांनी केला.
“देवेंद्र फडणवीसांच्या काळातच गृहखात्याची वाट लागली. मनाला येईल त्याप्रमाणे बदल्या करायच्या. पोलीस यंत्रणेचा वापर करुन विरोधकांनाच नव्हे तर ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसे वेठीस धरले होते. अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे माहिती आहे,” असेही अनिल गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.
फडणवीसांचा फक्त मुख्यमंत्रिपदावर डोळा
“प्रत्येक वेळेला सुशांतसिंग राजपूत, कंगना रनौत, अर्णव गोस्वामी आणि आता वाझे प्रकरण उपस्थित करायचे. प्रसार माध्यमांच्या मागण्यांची पूर्तता करायची आणि महाराष्ट्रातील गारपीट, अवकाळी पाऊस, शेतीमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर, बेरोजगारी, कोरोना या प्रश्नांवर जो अक्रस्ताळेपणा आवश्यक आहे, तो करत नाही.”
“फक्त मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून आपल्या पाच वर्षाच्या कालावधीतील भानगाडी उघड्या होता कामा नये, हा हेतू मनात ठेवून फक्त खोटं बोलत आहेत,” असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. (NCP Anil Gote allegation on Devendra Fadnavis)
परमबीर सिंग प्रकरण भविष्यात भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊतhttps://t.co/o5FaHjGMJH#SanjayRaut #Shivsena #BJP #ParambirSinghLetter #Saamana
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या
धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह? हायकमांडला रात्रीच अहवाल पाठवला जाणार
अन्याय होत असेल तर आपल्या सरकारविरोधातही रस्त्यावर उतरा; नितीन राऊतांचं आवाहन