राष्ट्रवादीच्या 412, तर भाजपच्या 312 प्रचारसभा, राज्यात कोणत्या नेत्यांच्या किती सभा?

सत्ताधारी भाजपने राज्यात एकूण 312 रोड शो, रॅली, सभा, बैठकांचे आयोजन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात एकूण 412 प्रचारसभा (NCP - BJP Political Campaigning) घेतल्या.

राष्ट्रवादीच्या 412, तर भाजपच्या 312 प्रचारसभा, राज्यात कोणत्या नेत्यांच्या किती सभा?
Follow us
| Updated on: Oct 19, 2019 | 11:10 PM

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनीही चांगलीच कंबर कसली होती. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज (19 ऑक्टोबर) थंडावल्या. निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात सत्ताधारी भाजपने राज्यात एकूण 312 रोड शो, रॅली, सभा, बैठकांचे आयोजन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात एकूण 412 प्रचारसभा (NCP – BJP Political Campaigning) घेतल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात 60 सभा घेतल्या आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे 12, माजी मुख्यमंत्री अजित पवार 35 सभा आणि 5 रोड शो केल्या. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील 65, अमोल मिटकरी 67, खासदार अमोल कोल्हे 65 सभा घेतल्या.

याशिवाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ 48, धनंजय मुंडे 38, सुनिल तटकरे 17 सभा घेतल्या. अशाप्रकारे राष्ट्रवादीने एकूण 412 सभा घेतल्या. यातील प्रत्येक सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

तर दुसरीकडे विधानसभेच्या घोषणांपूर्वी भाजपने महाजनादेश यात्रेचे आयोजन केलं होतं. विधानसभेची घोषणा झाल्यानतंर भाजपकडून एकूण 312 बैठकांसह, रॅली,प्रचारसभांचे आयोजन केलं होतं. यात 177 राष्ट्रीय नेत्यांच्या रॅली, राज्यातील नेत्यांच्या 95 रॅली, 11 बैठका, 8 मॉर्निंग वॉकचा समावेश होता.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 9 सभा घेतल्या. जळगाव, साकोली, अकोला, परतूर, पनवेल, परळी, सातारा, पुणे, मुंबई या नऊ ठिकाणी मोदींच्या सभा पार (NCP – BJP Political Campaigning) पडल्या.

तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात 20 रॅली आणि 1 रोड शो केला. परळी, जत, अक्कलकोट, तुळजापूर, औसा, चिखली, करंजा, धरणी, कराड, शिरुर (रोड शो), कोल्हापूर दक्षिण, कराड दक्षिण, गंगापूर, अहेरी, राजूरा, वणी, सावनेर, कामठी, नवापूर, अकोले, कर्जत जामखेड या 20 ठिकाणी शाहांच्या रॅली झाल्या.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या राज्यात 5 रॅलींसह 1 बैठक, 1 रोड आणि एक पत्रकार परिषद घेतली. राज्यातील अंबाड, फुंलब्री, शहादा, शिंदखेडा, हिंगोली, उल्हासनगर, नवी मुंबई या ठिकाणी जे.पी. नड्डांच्या सभा झाल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात 35 सभा घेतल्या. धामणगाव, वरोरा, चिमूर, उमरेड, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर 4, मोर्शी, काटोल 2, सावनेर, नागपूर मध्य 3 , आमगाव, रामटेक 2 , कामठी, सावनेर, नागपूर दक्षिण 2 , नागपूर पश्चिम 2, यवतमाळ, बल्लापूर, चंद्रपूर, सावनेर, हिंगाणा, गोंदिया, कामठी, नागपूर पूर्व, अर्वी, नागपूर या ठिकाणी नितीन गडकरींच्या सभा पार पडल्या.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक 46 सभांसह, 3 रोड शो, 1 मॉर्निंग वॉक केला. मंगळवेढा, माळशिरस, मानखटाव, फलटण, भोसरी, चिंचवड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पेण, उल्हासनगर, ठाणे, वाशिम, दर्यापूर, आर्वी, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, सावनेर, मलकापूर, साकोली, जळगाव जामोद, खामगाव, वर्सोवा, चांदूर, दिग्रास, अर्णी, पुसद, भोकर, कणकवली, शिराळा, पुरंदर, मावळ, ऐरोली, मुखेड, नयागाव, किनवट, अमरावती, नागपूर दक्षिण 1, नागपूर उत्तर, दौंड, इंदापूर, बारामती, विक्रमगड, डहाणू, जलालखेडा, कन्हण, तुमसर, घणसावंगी, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतल्या.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.