सुप्रिया सुळेंना धक्का, राष्ट्रवादीच्या बारामतीच्या निरीक्षकाचाच भाजपात प्रवेश
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे सध्या गावोगाव जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या निरीक्षकानेच भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती सुप्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीच्या निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राहुल शेवाळे […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे सध्या गावोगाव जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या निरीक्षकानेच भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती सुप्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीच्या निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
राहुल शेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख होती. पुणे जिल्ह्यातील युवक संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने जिल्ह्यात तरुणांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. शिवाय ते पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातूनही इच्छुक होते. पण त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतलाय.
बारामतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुप्यात सभा झाली. या सभेसाठी इतर नेत्यांसह चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. त्यांच्या भाषणात त्यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. शिवाय अनेक वर्षांपासूनची प्रलंबित कामं मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावली आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पराभव निश्चित आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची सभा सुरु होण्यापूर्वी सुप्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावरुनही चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्षे सुपा भाग दुष्काळी केला, त्या भागात मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच पाऊस आला. सुप्रिया सुळे पडणार म्हणून सगळेच आनंदी, असं ते म्हणाले.
बारामतीसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बारामतीसह जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले अशा एकूण 14 जागांसाठी मतदान होणार आहे.