प्रसाद लाड म्हणाले, सेनाभवन फोडू; छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा, म्हणाले…
जुने जाणते शिवसैनिक, मंत्री छगन भुजबळ यांना प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांच्यातलाही शिवसैनिक जागा झाला. त्यांनीही एका वाक्यात उत्तर देत प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारलं.
नाशिक : वेळ आली तर शिवसेनाभवन फोडू म्हणणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. राज्यभरातले शिवसेना नेते-पदाधिकारी लाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दुसरीकडे जुने जाणते शिवसैनिक, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांच्यातलाही शिवसैनिक जागा झाला. त्यांनीही फक्त एका वाक्यात उत्तर देत प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारलं.
लोकांना विनोद करण्याची हुक्की येते!
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी आवर्जून भुजबळांना प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. भुजबळांनी मात्र आक्रमक उत्तर देणं टाळत हसत हसत उत्तर दिलं. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले. एकंदरित लाड यांचं वक्तव्य भुजबळांनी फार गांभीर्याने घेतलं नाही. प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारण्याचा भुजबळांनी प्रयत्न केला.
राऊतांनी तर प्रसाद लाड यांची इज्जत काढली!
शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली.
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारलं असता, त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता त्यांना अनुल्लेखाने मारलं.
वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्दात लाड यांची इज्जत काढली.
गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.
प्रसाद लाड यांची कोलांटउडी!
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही.
(NCP Chhagan Bhujbal on Prasad lad Shivsena Bhavan Controvercial Statement )
हे ही वाचा :
प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, संजय राऊतांनी 3 शब्दात इज्जत काढली
तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, शिवसेना खवळली
“बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण, जनता यांना निवडणुकीत भुईसपाट करणार”