राणेंचा ‘पावरगेम’! पुस्तक प्रकाशनला शरद पवार प्रमुख पाहुणे, मुख्यमंत्र्यांना मात्र वेळ नाही

येत्या 16 ऑगस्टला मुंबईत नारायण राणेंच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजतित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

राणेंचा 'पावरगेम'! पुस्तक प्रकाशनला शरद पवार प्रमुख पाहुणे, मुख्यमंत्र्यांना मात्र वेळ नाही
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 11:04 AM

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे येत्या 16 ऑगस्टला प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशनला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राणेंच्या पुस्तक प्रकाशनला पवारांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

नारायण राणेंच्या आत्मचरित्राच्या पुस्तक प्रकाशन सोहळा येत्या 4 ऑगस्टला होणार होता. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र अद्याप या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणताही वेळ दिलेला नाही. त्यामुळे हा कार्यक्रमाची तारीख पुढे ढकल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान येत्या 16 ऑगस्टला मुंबईत नारायण राणेंच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजतित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रातील  इंग्रजी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीला शरद पवार यांची प्रस्तावना देण्यात आली आहे. दरम्यान एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना मुख्यमंत्री राणेंच्या पुस्तक प्रकाशनला वेळ देत नाहीत. तर दुसरीकडे शरद पवार मात्र या प्रकाशनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरण दिसणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनी ‘No Holds Barred’ नावाचं आत्मचरित्र लिहून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं सुरुवातच ‘जर्नी टू नारायण राव’ अशी आहे. एकूण 12 प्रकरणांमधून गौप्यस्फोट, दावे आणि आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे तिक्ष्ण प्रहार केलेत. 2002 मध्ये आघाडी सरकार पाडण्याचा प्लॅन फसला, असा दावाही राणेंनी केला. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यातला एक प्रयत्न 2002 साली झाला. 2002 मध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसह उद्धव ठाकरेंनी आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.

नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दलही गौप्यस्फोट केला आहे. “2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर काही दिवसांनी राज ठाकरे माझ्याकडे आले. उद्धव ठाकरेंमुळं आपण त्रासलो असून नवा पक्ष स्थापन करु”, असा प्रस्ताव राज ठाकरेंनी माझ्यासमोर ठेवला. मात्र, “राज ठाकरेंबरोबर मी काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत मला माहित आहे, त्यामुळे पुन्हा ठाकरेंसोबत काम करु शकत नाही.” असेही राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडावी लागली, राणेंचा आत्मचरित्रात खुलासा

राणेंचं आत्मचरित्र 192 पानांचं, चर्चा फक्त ‘पान क्र. 81’चीच!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.