Sharad Pawar | शरद पवार सावध, राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन करुन चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या बातम्या पसरल्यानंतर शरद पवार सावध झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar | शरद पवार सावध, राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन करुन चौकशी
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:16 AM

मुंबई : पक्ष फुटीची चर्चा रंगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावध भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाच्या बातम्या पसरल्यानंतर शरद पवार सावध झाले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या बातम्यांवर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. पण शरद पवार सतर्क झाल्याची माहिती समोर येत आहे. कारण गेल्या दोन दिवसांत काही आमदारांनी उघडपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे तशी संभाव्य राजकीय घडामोड घडू शकते का? याची चाचपणी आता शरद पवारांनी सुरु केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार पक्षातील सर्व आमदारांसोबत फोनवर बोलून माहिती घेत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या रंगलेल्या चर्चा आणि आमदारांचं त्याबाबत असलेले मत जाणून घेण्याचं काम शरद पवार आता करत असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार खरंच तसा काही निर्णय घेतील तर पुढे रणनीती काय आखायची याबाबतची पवार विचार करु शकतात.

अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं तरीही…

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलंय. अजित पवार यांनी आपल्या बंडाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी आपण आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच काम करु, असंही ते म्हणाले. एकीकडे अजित पवार असं बोलत असले तरी पडद्यामागील घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपला जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतत असल्याची बातमी समोर आलीय.

अजित पवारांना आमदारांचा जाहीरपणे पाठिंबा

दरम्यान अजित पवार यांना दोन आमदारांनी तर जाहीर पाठिंबा दिला आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि सटाण्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी उघडपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसचे भाजपला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचं विधान सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. तर अण्णा बनसोडे यांनी महाराष्ट्रात वेगळ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं  अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडी पाहता सुप्रीम कोर्टाचा राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल समोर आला तर काय घडणार? हा प्रश्न निर्माण झालाय.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.