Video | ‘आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच’, मलिकांच्या ईडी चौकशीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

Nawab Malik's ED inquiry : शरद पवार म्हणालेत की, 'तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तुम्ही लहान त्या काळात.. माझ्यावरही असाच आरोप झाला होता.. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो..

Video | 'आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच', मलिकांच्या ईडी चौकशीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया
नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:45 AM

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी पहाटे जाऊन ईडीनं (Enforcement Directorate) जी कारवाई केली, त्यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar on Nawab Malik’s ED inquiry) यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलं असता, आता काय बोलयाचं यावर.. यात काही नवीव नाही, असं शरद पवार म्हणालेत. कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होतीत., त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणालेत. कशाची केस काढली त्यांनी..? एक साधी गोष्ट आहे, साधा कार्यकर्ता असला, की दाऊदचं नाव घ्यायचं, आणि अडकवायचं, असले प्रकार सुरु आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

नेमकं काय म्हणाले पवार?

‘तुम्हाला माहीत नसेल कदाचित.. तुम्ही लहान असाल तेव्हा… त्या काळात माझ्यावरही असाच आरोप झाला होता.. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो.. याला आता 25-एक वर्ष झाली.. तरी आता तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं… जे लोकं भूमिका केंद्राच्या विरोधात स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना त्रसा देण्याचा प्रयत्न आहे…’ असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आज घडलं आज सकाळी?

बुधवारी सकाळी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. इकबाल कासकर यांनी मलिकांचं नाव घेतल्यामुळे त्यांना ईडीनं चौकशीसाठी नेल्याचं सूत्रांनी म्हटलंय. याप्रकरणी सकाळी पावणे आठ वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना नोटीस न देतो, समन्स न बजावता त्यांच्यावर ईडीनं अशाप्रकारे कारवाई केली गेली असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केलं जात आहे. सध्या मुंबई ईडी कार्यालयात त्यांची चौकशी आहे. जमीन मालमत्तेशी संबंधित गैरव्यवहाराचं प्रकरण असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. 1993 खटल्यातील आरोपीकडून मलिकांच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी झाल्याचाही आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

नेमकं प्रकरण काय?

  1. – 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
  2. – कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
  3. – 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
  4. – मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
  5. – 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25रु. स्वेअर फुटांनी केली.
  6. – जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.

पाहा व्हिडीओ –

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...